भर दुपारी बिबट्याचा धुमाकूळ! मेंढ्यांच्या कळपावर हल्ला, एक ठार

भर दुपारी बिबट्याचा धुमाकूळ! मेंढ्यांच्या कळपावर हल्ला, एक ठार

आरडगांव l वार्ताहर

राहुरी तालुक्यातील मानोरीत गेल्या दोन दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. भर दुपारी मेंढ्यांच्या कळपावर या बिबट्याने हल्ला चढवत एक मेंढी ठार केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घाबरहाटीचे वातावरण पसरले आहे.

रात्रीच्या दरम्यान दूध घालायला चाललेल्या शेतकऱ्याला हा बिबट्या निदर्शनास पडला होता. त्यामुळे सदर शेतकऱ्याची चांगलीच भांबेरी उडाली. घाबरलेल्या अवस्थेत या शेतकऱ्याने सदर ठिकाणावरून पळ काढला.अनेक रानं मोकळे झाल्यामुळे हा बिबट्या अनेकांच्या निदर्शनास येत आहे.

तर भर दुपारी जबाजी बाचकर या मेंढपाळाच्या कळपावर बिबट्याने हल्ला चढवला आणि एक मेंढी उसामध्ये ओढत नेत ती फस्त केली आहे. सदर शेतकऱ्यांच्या मदतीला काही शेतकरी धावून आल्याने या बिबट्याने उसामध्ये धूम ठोकली.

सदर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी सरपंच आब्बास शेख, भाऊसाहेब आढाव,विकास वाघ,पपु भिंगारे,देविदास वाघ,अशोक वाघ,नारायन वाघ,दिपक खुळे सोन्याबापू पिलगर, भाऊसाहेब चोथे, तेजस बाचकर, नवनाथ चोथे, जलील पठाण येथील शेतक-यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com