बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धा ठार

निळवंडे शिवारातील घटना
बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धा ठार

अकोले |प्रतिनिधी|Akole

एका 65 वर्षीय वद्धेला (Old Woman) बिबट्याने (Leopard) 100 फूट फरफटत नेऊन फडशा पाडल्याची घटना तालुक्यातील निळवंडे (Nilwande) शिवारातील खडके वस्तीवर गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात बिबट्याने (Leopard) घेतलेला हा दुसरा बळी आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण दिसून येत आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धा ठार
प्रिंपी अवघड शिवारात ट्रक व मोटारसायकलचा अपघात

अकोले (Akole) तालुक्यातील निळवंडे (Nilwande) शिवारातील खडके वस्तीवर रखमाबाई तुकाराम खडके (वय 65) या राहत असुन गुरुवारी रात्री त्या छपराच्या घरात झोपलेल्या असताना मध्यरात्रीनंतर पहाटेच्या दरम्यान बिबट्याने (Leopard) घरात प्रवेश करुन झोपलेल्या रखमाबाई खडके यांच्यावर हल्ला (Attack) करुन त्यांना 100 फूट ओढत नेऊन त्यांचा फडशा पाडला. या हल्ल्यात (Attack) रखमाबाई खडके यांचा मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेने निळवंडे (Nilwande) व परिसरातील गावामध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धा ठार
श्रीरामपूर बाजार समिती निवडणुकीस उच्च न्यायालयाकडून स्थगिती

वारंवार बिबट्याचे हल्ल्याने (Leopard Attack) शेतकरी वर्ग हैराण झाला असुन रात्रीची शेतीची कामे कसे करायचे हा प्रश्न उभा राहिला आहे. बिबट्याचा (Leopard) वावर पूर्वी होता मात्र आता तो मोठ्या प्रमाणात वाढला असुन बिबट्या माणसांवरही हल्ले (Attack) करु लागले असल्याने वनविभागाने (Forest Department) गावोगावी पिंजरे लावावेत अशी मागणी नागरीकांकडुन होत आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धा ठार
जिल्ह्यात भूकंपाची नोंद नाही

यापूर्वी आदल्या दिवशी याच ठिकाणाहून बिबट्याने (Leopard) शेळी नेली होती. त्यामुळे त्याला चटक लागल्याने आज पुन्हा येत बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केला असावा असा अंदाज वनक्षेत्रपाल यांनी व्यक्त केला असुन सदर घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली असुन या घटनेबाबत सविस्तर प्रस्ताव शासन दरबारी पाठवून शासनाचे मदतीची अनुदान रक्कम कुटुंबातील वारसांना उपलब्ध करुन देवु असा विश्वास राजुर वनक्षेत्रपाल राजश्री साळवे यांनी दिला आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धा ठार
दुबईतील जानी विश्वनाथन यांची बीज बँकेला भेट

सदर घटनेचा पंचनामा करुन मृतदेहाचे अकोले ग्रामीण रुग्णालयात (Akole Rural Hospital) शवविच्छेदन करण्यात आले. व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

तालुक्यात उसाचे प्रमाण वाढले असल्याने बिबट्याचा (Leopard) वावर जास्त प्रमाणावर वाढला आहे. शिकारी साठी बिबट्याचा वावर मानव वस्तीमध्ये वाढला असून अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये म्हणुन सर्व नागरिकांनी स्वतः काळजी घ्यावी, विशेष करून लहान मुलांवर लक्ष ठेवावे.असे आवाहन राजूर वनक्षेत्रपाल राजश्री साळवे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com