बिबट्याचा प्रवाशावर हल्ला

FIle Photo
FIle Photo

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील खर्डे पाटोळे वस्ती शाळेजवळ बुधवारी बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. रस्त्याने जाणार्‍या प्रवाशांवर बिबट्याने हल्ला चढविल्याने नागरिक भयभीत झाले होते. यासंदर्भात वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केलीआहे.

FIle Photo
तहसीलदारांची महसूलमंत्री ना. विखे यांनी काढली खरडपट्टी

बुधवारी कोल्हार येथील अंबिकानगर मधील रहिवासी मधुकर वसंत आढाव हे रस्त्याने चालले असता मादी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यातून ते बालंबाल बचावले. तर हनुमंतगाव, पाथरे, सात्रळ येथून जाणार्‍या प्रवाशांवरही या बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. या रस्त्याच्या कडेलाच वस्ती असलेले कोल्हारचे पोलीस पाटील सुखलाल खर्डे, पोपटराव खर्डे, कैलास घोलप हे रस्त्याच्या कडेला काठ्या घेऊन थांबून प्रवाशांना सुखरूप काढून देत होते.

FIle Photo
महाविकास आघाडी सरकार हे महावसुलीचे सरकार होते - महसुलमंत्री ना. विखे

दरम्यान येथील स्थानिक रहिवाशांनी फटाके वाजूनही बिबट्या जात नाही म्हणून शोध घेतला असता मादी बिबट्याबरोबर दोन पिल्ले आढळून आली. सगळीकडे पावसाचे पाणी साचल्याने मादीने बाळांना कोरड्या जागेवर रस्त्यापासून थोडे दूर सुरक्षित ठेवले होते. पण बाळाच्या संरक्षणासाठी जवळून जाणार्‍या वाहनांवर मादी चिडून हल्ला करत होती. माणसाची गर्दी वाढल्याने मादीने बछड्यांना घेऊन तेथून पळ काढला.

FIle Photo
गॅस स्फोटात माय लेकिच्या मृत्यु प्रकरणी पतीसह बारा जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

या रस्त्यावर खूप गर्दी असते. जवळच मोहटा देवीचे मंदिर आहे. नवरात्रात महिला या ठिकाणी तसेच कोल्हारला देवी दर्शनासाठी पहाटे जातात. तसेच व्यायाम करणारी मंडळीही पहाटे रस्त्याने जात असतात. त्यामुळे या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांनी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली व उपयुक्त सूचना दिल्या. तसेच वन खात्याला कळविण्याचे आश्वासन दिले.

FIle Photo
सीनेच्या पूरात पिंपळगाव माळवीत पुलासह कार गेली वाहून
FIle Photo
कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com