बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार, चार जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार, चार जखमी

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील आंबड येथे पाडाळणे घाटाच्या पायथ्याशी राहत असलेल्या रावजी वाळीबा जाधव यांच्या राहत्या घराजवळ असलेल्या गोठ्यावर बिबट्याने मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला. गोठ्यातील एकूण तेरा शेळ्यांपैकी चार शेळ्या बिबट्याने जागीच ठार केल्या व चार शेळ्यांच्या मानेला पकडून त्यांना गंभीर जखमी केले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार, चार जखमी
महसूलमंत्र्यांनी पकडलेल्या वाळू उपसा बोटी प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

अचानक तडफडण्याचा आवाज ऐकून घरातील माणसांना जाग आली म्हणून ते बाहेर आले परंतू त्यांना बिबट्याचा संशय आल्यानंतर पुन्हा घराचा दरवाजा बंद करून आतून आरडाओरड केली. परंतू परिसरात मानवी वस्ती दुर असल्यामुळे आरडाओरड करून काहीच उपयोग झाला नाही. शेजारी गोठा असलेले शिवाजी जाधव यांना बिबट्याची चाहुल लागताच त्यांना जाग देखील आली परंतू त्यांचा ही नाईलाज झाला रावजी जाधव व शिवाजी जाधव दोघेही आतून बिबट्याला पाहून जोरजोरात ओरडत होते परंतू बिबट्याचा रूद्र अवतार बघून त्यांना काहीच करता आले नाही.

बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार, चार जखमी
ऑनलाईन शॉपिंगमध्ये युवकाची फसवणूक

शेवटी बिबट्याने मारलेल्या शेळ्यांपैकी एक शेळी जवळच असलेल्या जंगलात फरफटत ओढून पळ काढला त्यानंतर रावजी जाधव यांनी गोठ्यात जाऊन बाकीच्या शेळ्यांची चौकशी केली असता त्यामधील चार शेळ्यांच्या मानेला खोलवर जखमा आढळून आल्या तर गोठ्यात रक्ताचा सडा पडला होता सकाळीच या घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी प्रदिप कदम यांना माजी सरपंच दत्तू जाधव यांनी दूरध्वनीवरून कळविली असता त्यांनी तातडीने वनपरिमंडळ अधिकारी व्ही. एन. पारधी यांना घटनास्थळी पाठवून मृत शेळ्यांचा पंचनामा करण्याचे आदेश दिले.

बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार, चार जखमी
पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा अधिक गतीमान करण्याचे आव्हान!

यावेळी वनमजूर सूर्यभान नरवडे, उत्तम पोखरकर, अंकूश काकड व संबंधित गोठा मालक व ग्रामस्थ उपस्थित होते. बिबट्याच्या हल्यामुळे परिसरातील रहिवाशी व शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन दिवाळीत बिबट्याने चार गाभण शेळ्या ठार केल्याने रावजी जाधव यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वन विभागाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावा तसेच बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी संबंधित शेतकर्‍याकडून करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com