रामपूरमध्ये भरदिवसा बिबट्याने शेळीसह दोन कुत्र्यांचा पाडला फडशा

फटाके वाजवल्यावर बिबट्याने काढला पळ
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाऊर |वार्ताहर| Naur

श्रीरामपुर तालुक्यातील रामपूर येथे गावालगत असलेल्या भडांगे यांच्या वस्तीवरील संजय त्रिंबक भडांगे गट नं. 18 मध्ये भर दुपारी 3 च्या सुमारास उसातुन आलेल्या बिबट्याने घरासमोर असलेल्या शेळीला अचानक उचलून घेऊन उसात जात असतांनाच संजय भडांगे यांच्या पत्नीने आरडाओरड केल्यानंतर भडांगे परिवारातील सदस्यांनी घराबाहेर येऊन फटाके फोडले असता बिबटयाने तोंडात धरलेल्या शेळीला तिथेच सोडून उसात पळ काढला. या बिबट्याबरोबर आणखी एक बिबट्यादेखील असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

गेल्या अनेक महिन्यांपासून गोदावरी पट्ट्यातील नाऊर, रामपूर, सराला, गोवर्धन, सावखेड गंगा आदी परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर सुरू असून यापूर्वी नाऊर येथील शरद शिंदे यांच्याकडून फडशा पाडला होता. त्यावेळी वनविभागाने कुठल्या प्रकारची दखल घेतली नव्हती. त्यानंतर शिंदे वस्ती परिसरात रहिवासी असलेल्या अनेकांना बिबट्याचे कायम दर्शन होत होते. या भागातील नागरिकांनी पिंजर्‍याची मागणी केली असता पिंजरा लावण्यात आला होता. मात्र बिबट्या त्या पिंजर्‍यात अडकला नव्हता.

यानंतर आता पुन्हा रामपूर शिवारामध्ये बिबट्याने पहिल्या दिवशी गणेश खेमनर यांच्या गट नंबर 9 मध्ये त्यांच्यासमोर समोरून कुत्र्याला ओढून नेले.तर तिथेच राहत असलेले अमोल गहिरे यांच्या देखील वस्तीवरचा कुत्रा बिबट्याने ओढून नेला होता. या परिसरात दोन बिबट्यांचा वावर असून अनेक शेतकर्‍यांना कधी बाभळीच्या तर कधी लिंबाच्या झाडावर देखील दर्शन झालेले आहे. बिबटयाच्या दहशतीमुळे मजुरी काम करणार्‍या पुरुषासह महिला शेतामध्ये जाण्यास धजावत नसल्याने बिबट्यामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com