धुमाळवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर ठार

धुमाळवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर ठार

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील (Akole) धुमाळवाडी (Dhumalwadi) येथील झोळेकर वस्तीजवळ रात्री संतोष कारभारी गावंडे (वय 45) हा शेतमजूर शेतातील काम उरकून घरी जात असताना बिबट्याने हल्ला (Leopard attack) करून ओढत ऊसाच्या शेतात नेऊन पोट फाडून खाल्ल्याची घटना घडली आहे.

तालुक्यातील धुमाळवाडी, धामणगाव आवारी आदी गावांत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे शेळ्या, मेंढ्यांवर हल्ले सारखे सुरू (Leopards continue like attacks on goats, sheep) आहेत. ग्रामस्थांनी अनेकदा पिंजरा लावण्याची वनविभागाकडे मागणी केलेली आहे. अशातच रविवारी मध्यरात्री धुमाळवाडी शिवारातील झोळेकर वस्तीजवळ धामणगाव आवारी रोड लगत शेतात संतोष कारभारी गांवडे (वय 45) (Santosh Karbhari Gavde) हा शेतमजूर काम उरकून घरी जात असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला ओढत उसाच्या शेतात नेवून त्याचे पोट फाडून खाल्ल्याची घटना घडली आहे.

दरम्यान सकाळी या घटनेची स्थानिकांनी पोलिस पाटलांना माहिती देताच पोलिस पाटील सौ. प्रणाली प्रशांत धुमाळ यांनी पोलीस व वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळाल्यावर सकाळी वनाधिकारी श्रीमती भाग्यश्री पोले, वनपाल पारधी, पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, सरपंच डॉ. रवींद्र गोर्डे, धामणगाव आवारी उपसरपंच गणेश पापळ व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली व वन कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे.

आमच्या धुमाळवाडी, धामणगाव आवारी गावात बिबट्याचा वावर वाढलेला आहे. याबाबत आम्ही पिंजरा लावण्याची वनविभागाकडे मागणी केलेली आहे आता बिबट्याने मनुष्याचाच खून केल्याने बिबट्याच्या तोंडाला रक्त लागले असल्याने हा बिबट्या नरभक्षक झाला असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा धोका असल्याने वनविभागाने तात्काळ दखल घेत पिंजरा लावावा.

- डॉ. रवींद्र गोर्डे, सरपंच, धुमाळवाडी ग्रामपंचायत

धुमाळवाडी येथील घटनेत प्रथम दर्शनी बिबट्याचे हल्ल्यात सदर शेतमजूराचा मृत्यू झाला असल्याचे दिसत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असुन शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यातच झाल्याचे सिद्ध झाल्यावर वनविभागाकडून आर्थिक सहाय्य त्या कुटुंबाला दिले जाईल व सायंकाळ पर्यंत सदर विभागात पिंजरा लावण्यात येईल.

- श्रीमती भाग्यश्री पोले, वनक्षेत्र पाल, वनविभाग, अकोले

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com