बिबट्याचा शेतकर्‍यावर हल्ला

बिबट्याचा शेतकर्‍यावर हल्ला

धामोरी |वार्ताहर| Dhamori

कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील धामोरी (Dhamori) येथील शेतकरी गंगाधर वाळीबा ठाकरे यांच्यावर मंगळवारी रात्री बिबट्यांने हल्ला (Leopard Attack) केला. त्यात ठाकरे गंभीर जखमी (Injured) झाले आहे.

बिबट्याचा शेतकर्‍यावर हल्ला
धक्कादायक! आईसह दोन मुलींनी केली आत्महत्या

धामोरी (Dhamori) शिवारात उत्तरेकडील 2 कि.मी अंतरावर गंगाधर ठाकरे हे कुटुंबासह राहतात. मंगळवारी रात्री 2:40 च्या दरम्यान गोठ्यातील गायीवर व नंतर कुत्र्यावर बिबट्या हल्ला करत असतांना ठाकरे यांनी गायीस व कुत्र्याला (Dog) वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु बिबट्याने (Leopard) गाय व कुत्र्याला सोडून ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला. त्यात ते गंभीर जखमी (Injured) झाले. त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर घरातुन पत्नी व नातु ज्ञानेश्वर यांनी धाव घेतली.

बिबट्याचा शेतकर्‍यावर हल्ला
कारच्या धडकेत किर्तनकार जागीच ठार !

नातवाने बटरी चमकविल्यामुळे प्रकाश झोताने बिबट्याने त्यांना सोडले व बिबट्या शेतात पळुन गेला. घटना समजताच शेजारील शेतकरी सुनिल वाणी यांनी त्यांना चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Centre) प्राथमिक उपचार करुन पुढिल उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात (Kopargav Rural Hospital) दाखल केले. त्यांच्या डोक्याला, हातावर बिबट्याने जोरदार हल्ला (Attack) केल्यामुळे जखमा खोल असुन बिबट्याने सात ते आठ ठिकाणी चावे घेतल्याने त्यांना 52 टाके पडले आहे.

बिबट्याचा शेतकर्‍यावर हल्ला
महाराष्ट्रातील अडीच हजार महिलांना फसवून ओमान, दुबईत नेले

घटनेची माहीती समजताच परीसरातील नागरीकांमध्ये भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. यापुर्वी बिबट्यांने (Leopard) काही महीन्यापुर्वी माजी उपसरपंच प्रभाकर मांजरे यांची गाय, पाराजी दिघे यांची शेळी, साहेबराव माळी, रवि आरगडे व भाऊसाहेब कुराडे यांचे कुत्रे खाल्याची घटना घडलेली आहे. या सर्व घटनेमुळे परीसर आधीपासुन भयभीत होता. त्यात ठाकरे यांच्या घटनेपासुन वातावरण गंभीर आहे.

बिबट्याचा शेतकर्‍यावर हल्ला
दोन मुली झाल्या म्हणून छळ; विवाहितेची आत्महत्या

ग्रामस्थांनी वनविभागाकडे (Forest Department) तक्रार करुन पिंजरा बसवण्याची मागाणीही केलेली आहे. परंतु वनविभागाने याकडे गांभीर्यांने लक्ष द्यावे. या मानवी हल्ल्यांने धामोरीसह अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सीमा भागातील शेतकर्‍यांत दहशत पसरली आहे. बिबट्याचा कोपरगांव वनविभागने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी व परीसरातील नागरिक करत आहे.

बिबट्याचा शेतकर्‍यावर हल्ला
कांदा भाव प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राहुरीत रास्तारोको
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com