अखेर कोपरगावातील ‘तो’ बिबट्या जेरबंद

अखेर कोपरगावातील ‘तो’ बिबट्या जेरबंद

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Operation) नंतर बिबट्या जेरबंद (Leopard Arrested) करण्यात वनविभागाला (Forest Department) यश आले आहे. कोपरगांव शहरात दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणारा मादी बिबट्याला (Leopard) मंगळवारी अथक प्रयत्न करत जेरबंद केले. त्यानंतर कोपरगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.

अखेर कोपरगावातील ‘तो’ बिबट्या जेरबंद
मंदिरातील दानपेट्या फोडणारी टोळी जेरबंद

सोमवार दि.16 ऑगस्ट रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास बैल बाजार रोडवर बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले. याचवेळी तो सुभाष नगर परिसरात गेला. तिथे एका तरुणावर हल्ला (Youth Attack) केला होता. त्यानंतर सोमवारी रात्री बिबट्याने बस स्थानकात एन्ट्री केली. वनविभागाचे कर्मचारी, पोलीस बस स्थानकात दाखल झाले. जाळ्यांच्या साह्याने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु हुलकावणी देत बिबट्याने बस स्थानकाची संरक्षण भिंत ओलांडून धारणगाव रस्त्याने संभाजी महाराज चौकाकडे चालत गेला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. चित्रीकरणासाठी जीव धोक्यात घालून अनेक जण त्याच्या सोबत चालत होते. त्यानंतर बिबट्या (Leopard) गायब झाला. तो मंगळवारी दुपारी भरवस्तीत बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या एचडीएफसी बँके शेजारी असलेल्या रिकाम्या जागेत दिसला.

अखेर कोपरगावातील ‘तो’ बिबट्या जेरबंद
समन्यायी पाणी वाटपाच्या संदर्भात आज प्रशासकिय आढावा बैठक

त्यानंतर संगमनेर (Sangamner) येथील वन विभागाच्या शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले. स्थानिक पोलीस (Police) व वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी पाच तास रेस्क्यू ऑपरेशन राबविले. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास मादी बिबट्याला जेरबंद (Leopard Arrested) करण्यात यश आले. यावेळी आमदार आशुतोष काळे, तहसीलदार संदीपकुमार भोसले, उपविभागीय वन अधिकारी संदिप पाटील, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख उपस्थित होते.

अखेर कोपरगावातील ‘तो’ बिबट्या जेरबंद
शिर्डीतून मोटारसायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; 30 मोटारसायकली हस्तगत

मादी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 5 तास रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. त्यात वनविभागाचे 15 कर्मचारी, शहर पोलिस यांचा सहभाग होता. जेरबंद करण्यात आलेल्या मादी बिबट्याला काही दिवस निगराणी खाली ठेवून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

- प्रतिभा सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी

अखेर कोपरगावातील ‘तो’ बिबट्या जेरबंद
कोपरगाव शहरात बिबट्याचा युवकावर हल्ला
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com