बिबट्या आणि रानडुकराचा धुडगूस

नान्नजदुमालात दोघा युवकांवर हल्ला, कुरणपूर येथे तरूण जखमी
बिबट्या आणि रानडुकराचा धुडगूस

तळेगाव दिघे (वार्ताहर) - संगमनेर तालुक्रातील नान्नजदुमाला शिवारात गुरुवारी दुपारी एक वाजेच्रा सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातला. मकाच्रा शेतात दबा धरुन बसलेल्रा बिबट्याने अचानक दोघा रुवकांवर हल्ला केला. बिबट्याच्रा हल्ल्रात दोघेही रुवक जखमी झाले. बिबट्याने नान्नजदुमाला परिसरात भरदिवसा चांगलाच धुमाकूळ घातला. त्रामुळे रहिवाशांमध्रे घबराटीचे वातावरण पसरले आहे.

संगमनेर तालुक्रातील नान्नजदुमाला शिवारातील चत्तर वस्ती व पाटोळे वस्ती परिसरात काही रहिवाशांना गुरुवारी दुपारी बिबट्या दिसला. परिसरात बिबट्या आला असल्राची माहिती सर्वत्र पसरली. त्रामुळे बिबट्याला हुसकावून लावण्रासाठी उपसरपंच सोमनाथ चत्तर रांच्रा नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्रेने गोळा होत शेताकडे गेले होते. त्रामध्रे ऋषीकेश रावसाहेब पाटोळे (वर 22) व ओंकार विलास पाटोळे (वर 17) रा रुवकांचा समावेश होता. दरम्रान मकाच्रा शेतात दबा धरुन बसलेल्रा बिबट्याने ऋषीकेश पाटोळे व ओंकार पाटोळे रा दोघा रुवकांवर हल्ला केला. ऋषिकेश पाटोळे रा रुवकाच्रा तोंडाला, डाव्रा हाताला व खांद्याला बिबट्याने पंजा मारीत व चावा घेत जखमी केले. ओंकार पाटोळे रा रुवकाच्रा डाव्रा हाताच्रा हाताला बिबट्याने चावा घेतला व पाठीवर पंजाने मारून जखमी केले. सदर जखमी रुवकांवर तळेगाव दिघे रेथील खाजगी रुग्णालरात प्रथमोपचार करण्रात आले.

नान्नजदुमाला शिवारात बिबट्याने दोघा रुवकांवर हल्ला करीत जखमी केल्राच्रा घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यास पकडण्रासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी उपसरपंच सोमनाथ चत्तर सहित रहिवाशांनी केली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - रानडुकराने धडक देउन चावा घेतल्याने 25 वर्षीय तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथे काल सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास घडली. गणेश उमाकांत चिंधे (वय 25) असे जखमी तरूणाचे नाव आहे. उपचारासाठी त्याला नगरला हलविण्यात आले आहे.

गणेश सायंकाळी आपल्या शेतातील घासाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. पाणी देत असताना अचानक धावत अकलेल्या रानडुकराने त्याला जोराची धडक दिली. यावेळी त्याने रानडुकराच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रतिकार केला असता रानडुकराने त्याच्या डोक्याला तसेच पायाला चावा घेतला. त्यात तो गंभीर जखमी झाला.

त्याने आरडा ओरडा केल्याने परिसरातील लोक घटनास्थळी धावले. लोकांनी तातडीने त्याला उपचारासाठी श्रीरामपूर येथे आणले. याबाबत वन विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली असता वनपाल विकास पवार, लांडे ताताडीने दवाखान्यात हजर झाले. त्यांनी जखमी चिंधे याची भेट घेऊन विचारपूस केली. सायंकाळी उशिरा त्याला पुढील उपचाराकरिता नगर येथे साई एशियन हॉस्पिटलला हलविण्यात आले.

दरम्यान, रात्री वनअधिकारी ब. एस. गाढे यांनी गावात भेट देऊन चिधे कुटूंबियांची भेट घेतली. कुरणपूर परिसरात बिबख्या बरोबरच रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या प्रवरा नदीला पाणी भरपूर असल्याने मका, ऊस ही पिके मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी लपण्यासाठी जागा असल्याने वन्य प्राण्यांचा परिसरात वावर आहे. वन विभागाने येथे पिंजरा लावून बिबट्या तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com