लेंडी नाल्याला आलेल्या पुरामुळे श्री साईनाथ रूग्णालयातील रूग्णांना हलवले सुपरला !

रूग्णालयाच्या ग्राऊंड फ्लोअरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी || शिर्डीसह परिसरात ढगफुटीसदृश पाऊस
लेंडी नाल्याला आलेल्या पुरामुळे श्री साईनाथ रूग्णालयातील रूग्णांना हलवले सुपरला !

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीसह (Shirdi) परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे (Cloudburst-Like Rain) लेंडी नाल्याला पूर (Lendi Nala Flood) आला होता. नाल्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे श्री साईनाथ रुग्णालयाची (Shri Sainath Hospital) भिंत कोसळली असून रुग्णालयातील ग्राउंड फ्लोअर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्याने रुग्णालयात (Patient) उपचार घेत असलेले सुमारे दोनशे रुग्णांना मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वैद्यकीय संचालक यांच्या सतर्कतेमुळे तातडीने श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात (Shri Saibaba Super Specialty Hospital) शिप्ट करण्यात आल्याने मोठी जिवीतहानी टळली आहे.

दरम्यान बुधवारी रात्री शिर्डी (Shirdi) शहरात तसेच परिसरात पडलेल्या 115 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पन्नास वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे पाऊस पडल्याने शहरातील अनेक उपनगरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. तर श्री साईबाबा (Shri Sai Baba) विश्वस्त व्यवस्थेच्या श्री साईनाथ रुग्णालयात (Shri Sainath Hospital) गुरूवारी दक्षिण बाजूची भिंत कोसळल्याने सकाळी सात वाजल्यापासून लेंडी नाल्याचे पाणी अचानकपणे रुग्णालयातील ग्राउंड फ्लोअर परिसरात आले होते.

यावेळी पॉवर हाऊस मध्ये पाणी आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे श्री साईनाथ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आयसीयु, स्रिरोग विभाग, जनरल वार्ड, वेगवेगळ्या विभागातील सुमारे 200 रुग्णांना साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (CEO Bhagyashree Banayat) व साईनाथ रुग्णालयाचे वैद्यकीय उपसंचालक डॉ प्रितम वाडगांवे यांच्या सतर्कतेमुळे आवश्यकतेनुसार सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर काही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आयसियु मध्ये एकुण 19 रुग्ण उपचार घेत होते त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास लोणी येथे पाठविण्यात आले आहे.दरम्यान श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेकडे पर्यायी व्यवस्था असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तसेच श्री साईनाथ रुग्णालयात कार्यरत असलेले दोनशे ते अडीचशे कर्मचारी या परिस्तीतीवर लक्ष ठेवून आहे.

गुरूवारी रात्री शिर्डीसह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील पुरपरीस्थीती बघीतल्यानंतर प्रांताधिकारी, तहसीलदार, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत याप्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी श्री साईसंस्थान प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेतला असून तातडीने बैठक घेण्यात यावी अशा सुचना श्री साईसंस्थानचे उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांना देण्यात आली आहे.

- श्रीमती भाग्यश्री बानायत, मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान

कोर्‍हाळे, नांदुर्खी येथून शिर्डीत येणार्‍या पाण्याचा प्रवाह शिर्डी प्रांताधिकारी, तहसीलदार, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी वळवून तो ओढ्यात सोडणे गरजेचे आहे. पाण्याचा नैसर्गिक मार्ग मोकळा करणे आवश्यक असून यासाठी श्री साईसंस्थानच्या वतीने आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करू.

- डॉ एकनाथ गोंदकर, विश्वस्त श्री साईबाबा संस्थान

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com