उन्हाळ्याची चाहुल लागल्याने लिंबु महागले; भाजीपाला आवक वाढली

उन्हाळ्याची चाहुल लागल्याने लिंबु महागले; भाजीपाला आवक वाढली

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उन्हाळ्याची चाहुल लागल्याने लिंबाला 11 हजार रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. राहाता बाजार समितीतील भाजीपाल्याला शिर्डी व राहाता तसेच अन्य ठिकाणा चांगली मागणा होत असल्याने भाजीपाल्याचे मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे. काल लिंबु किमान 6500 रुपये तर जास्तीत जास्त 11 हजार रुपये भाव मिळाला. तर सरासरी 8700 रुपये भाव मिळाला. आले 3000 ते 5000 रुपये, सरासरी 4000 रुपये.

बटाटा 1000 ते 1200 रुपये तर सरासरी 1100 रुपये. बिट सरासरी 1500 रुपये. भेंडी 2000 ते 4000 रुपये, सरासरी 3000 रुपये. दुधी भोपळा 500 ते 700 रुपये तर 600 रुपये. फ्लावर 800 ते 1300 रुपये, सरासरी 1000 रुपये. गाजर किमान 1500 रुपये तर जास्तीत जास्त 2500 रुपये तर सरासरी 2000 रुपये. गवार सरासरी 12000 रुपये प्रतीक्विंटल. घेवडा सरासरी 2000 रुपये. काकडी 1000 ते 1500 रुपये तर सरासरी 1200 रुपये. लसूण 3000 ते 5000 रुपये तर सरासरी 4000 रुपये.

ढोबळी मिरची 1000 ते 1500 रुपये, सरासरी 1200 रुपये भाव मिळाला. टोमॅटो 500 ते 1000 रुपये तर सरासरी 800 रुपये. वालवड सरासरी 1000 रुपये. वांगी 400 ते 1000 रुपये तर सरासरी 700 रुपये, मिरची (हिरवी) 3500 ते 5500 रुपये, सरासरी 4500 रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. शेवगा सरासरी 3500 रुपये प्रतिक्विंटल, मका कणीस सरासरी 1000 रुपये. खरबुज सरासरी 1000 रुपये.

कोथिंबीर 2 ते 4 रुपये व सरासरी 3 रुपये नग. मेथी भाजी 3 ते 7 रुपये, मुळा सरासरी 7 रुपये, पुदीना सरासरी 5 रुपये, शेपु सरासरी 4 रुपये. करडई सरासरी 5 रुपये, कांदा पात सरासरी 5 रुपये नग, पालक 5 रुपये सरासरी प्रतिनग रसं भाव मिळाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com