विधान परिषद रद्द झाल्याने अनेकांचा हिरमोड

‘भेटी’गाठी अन् फराळाच्या मेजवाणीला करपट ढेकर
विधान परिषद रद्द झाल्याने अनेकांचा हिरमोड

अहमदनगर (प्रतिनिधी)

विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागणार यामुळे गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि नगरपालिका पदाधिकारी आणि अधिकारी धास्तावले होते.

दुसरीकडे निवडणुकीसाठी इच्छुकांनी दिवाळीचा मुहूर्त साधत मतदारांना फळाची भेट पाठवली होती. मात्र, निवडणूक रद्द झाल्याने अनेकांना मिळालेल्या दिवाळी फराळाचे अपचन झाले असून त्याचे करपट ढेकर येण्यास सुरूवात झाली आहे. तर अनेकांचा हिरमोडही झाला आहे.

आधीचे दीड वर्षे करोनात गेले आणि आता निधी मिळाला तर निवडणुकीची आचारसंहिता लागणार यामुळे विकास कामांचा निधी अखर्चित राहण्याचा धोका होता. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, नगर पालिका, परिषदा यामधील अधिकारी आणि पदाधिकारी निधी खर्च होतो की नाही या विवंचनेत होते.

दुसरीकडे परंपरे प्रमाणे अनेक सदस्यांच्या मनात विधानसभा निवडणुकीमुळे आनंदाच्या उकाळ्या फुटल्या होत्या. मात्र, रंगतात असतांना 75 टक्के लोकबाडीचा निर्णय आडावा आल्याने नगर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. यामुळे या निवडणुकीसाठी पात्र असणार्‍या 396 मतदारांच्या आनंदावर विरजन पडले आहे.

आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर नव्याने निवडूण येणार्‍या हाती विधानपरिषद निवडणुकीची सुत्र जाणार असल्याने विद्यमान मतदारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. नगरच्या विधान परिषद निवडणुकीला मोठी परंपरा आहे. मागील पंचवार्षिकला एका तत्कालीन मतदाराने कहरच केला होता.

विधान निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होता महागडी गाडीच बुक केली होती. याबाबत त्यावेळी माध्यमामध्ये ही माहिती येताच त्याने चांगलाच संताप व्यक्त केला होता. अखेर त्याने ही बुक केलेली गाडी रद्द करत निवडणुकीनंतर काही महिन्यांनी तिच गाडी घरी आणली होती. यंदाही काही मतदारांना अशी अपेक्षा होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच असल्याने आता नवीन सदस्य विधान परिषदेचा नवीन आमदार ठरविणार आहे.

प्रशासनाने सोडला सुटकेचा नि:श्वास

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन आणि नगर पालिका अन् नगरपरिषद प्रशासनाने विधान परिषदेच्या आचारसंहितेचा धसकाच घेतला होता. मात्र, आता निवडणूक पुढे गेल्याने निधी खर्च करण्यास त्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे. यातून जिल्ह्यातील विकास कामांना वेग येणार आहे.

झेडपीला निधी खर्च करण्यास संधी

जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. जिल्हा नियोजनमधून मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेला निधी मिळणार असून यामुळे जिल्हा परिषद प्रशासन आणि पदाधिकार्‍यांना किमान 50 ते 60 दिवसांचा जादा कालावधी मिळणार आहे. या कालावधीत मोठ्यात निधी खर्च करण्यास त्यांना संधी राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com