विधान परिषदेत जिल्हा बँक पॅटर्न !

महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकसंघ राहण्याच्या सूचना
विधान परिषदेत जिल्हा बँक पॅटर्न !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Elections) जिल्हा बँक निवडणुकीचा पॅटर्न (District Bank Election Pattern) राबविण्याचा मनसुबा महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) निश्चित केला आहे. नेत्यांनी एकसंघ राहावे आणि भाजपला कोणतीही संधी मिळणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना असल्याचे सुत्रांनी सांगीतले.

विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Elections) नगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) कागदावरील पारडे जड आहे. मात्र या निवडणुकीत मतदान (Election Voting) फिकरण्याची शक्यताही असते. सध्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद (ZP), पंचायत समिती (Panchayat Samiti), महापालिका (Municipal Corporation), पालिकांचे सदस्य (Palika Member) असलेले 396 मतदार पात्र आहेत. त्यात राष्ट्रवादीचे (NCP) 91, काँग्रेसचे (Congress) 78, शिवसेनेचे (Shivsena) 60, भाजपचे (BJP) 119 (विखे गट 30), रासप 1, मनसे 1, बसपा 4, सपा 1, अपक्ष 7 आणि अन्य 4 मतदारांचा समावेश आहे.

निवडणुकीत विजयासाठी प्रथम पसंतीची 199 मतांची गरज असेल. कागदावरील बलाबलाचा विचार करता विजयासाठी आवश्यक प्रथम पसंतीच्या मतांची गोळाबेरीज आजघडीला महाविकास आघाडीकडे दिसून येते. सध्या महाविकास आघाडीच्या मतांची बेरीज 229 आहे. दुसरीकडे भाजपला प्रथम पसंतीच्या मतांसाठी अद्याप 80 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. भाजपच्या (BJP) 119 मतांमध्ये विखे गटाच्या 30 समर्थक मतदारांचा समावेश आहे. त्यांची भुमिका स्पष्ट झालेली नाही. सध्या संभाव्य उमेदवारांनी आपल्या मतदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

राज्य पातळीवर भाजपकडून सातत्याने होणार्‍या आरोपांचे उत्तर यापुढे मतदानातून द्यावे, यावर एकमत झाले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत आगामी विधान परिषद निवडणुकीतही कुठेही बेकी दिसू नये, याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे नगरची जागा राष्ट्रवादी (NCP) लढवणार हे गृहीत धरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या (Shivsena) हालचाली आहेत.

नुकत्याच झालेल्या अहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीत (Ahmednagar District Bank) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी विरोधी गटाला कोणतीही संधी मिळू नये, याची काळजी घेत डाव टाकले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Elections) महाविकास आघाडीच्या मतदारांना सांभाळण्यासाठी स्थानिक नेतृत्वावर जबाबदारी सोपवून कोणताही दगाफटका होवू नये, याची काळजी घेणार असल्याचे एका नेत्याने सांगीतले.

पवार येणार अन्...

ज्येष्ठ नेते शरद पवार या आठवड्याच्या अखेरीस नगर जिल्हा दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात स्थानिक नेत्यांसोबत विधान परिषदेवर अनौपचारीक चर्चा होण्याची शक्यता आहे. या जबाबदारी समजावून देण्यासाठी ते या काही वेळ खर्ची घालतील, असा अंदाज पक्षातील एका नेत्याने व्यक्त केला.

Related Stories

No stories found.