रुग्णांची अडवणूक केल्यास कायदेशीर कारवाई करणार : जिल्हाधिकारी

श्रीरामपूरात कोविड सेंटरची पहाणी
रुग्णांची अडवणूक केल्यास कायदेशीर कारवाई करणार :  जिल्हाधिकारी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

करोना रुग्णांकडून अगोदर डिपॉझीट घेवू नका, जादा बील घेवू नका, तसेच एखादा रुग्ण मयत झाला तर पैशासाठी अडवणूक करु नका, याबाबत तक्रारी आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यईल, असा इशारा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला.

जिल्हाधिकारी भोसले यांनी श्रीरामपूरातील कोवीड सेंटर तसेच शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, प्रांताधिकारी अनिल पवार, पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके, मुख्याधिकारी गणेश शिंदे, डॉ. योगेश बंड उपस्थित होते.

शहरात तेरा कोवीड सेंटर आहे, या ठिकाणी महसूल, पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी पहाणी करावी. बीलाचे ऑडिट करुन घ्यावे. तसेच कोरोनाचा संसंर्ग कमी होण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. दुथ विक्रीमुळे गर्दी होत असेल तर काही विक्री केंद्र बंद करावे. अशा सुचना प्रांताधिकारी यांना केल्या.

रेमडिसिहीर औषधाचा काळाबाजार सुरू आहे. एका कोविड सेंटर मधील दोघांवर गुन्हे दाखल केले, पुन्हा एका एक्स रे क्लिनिक मध्य काम करणार्‍या विरुद्ध पोलीसांनी कारवाई केली हे निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी असे प्रकाराबाबत कडक कारवाई करण्याबाबत सुचना पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके यांनी दिल्या.

कोरोना संसंर्ग साखळी तुमच्यासाठी शहरात गर्दी होणार नाही, या बाबत पालिकेने लक्ष दिले पाहिजे, अल्फा कोविड सेंटर संदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रारी केल्या. डिपॉझीट घेतल्याशिवाय रुग्णांवर उपचार सुरू केले जात नाही. जादा बीलाची आकारणी केली जाते या वरुन जिल्हाधिकारी यांनी संबंधित डॉक्टर यांना तंबी देत रुग्णांची पिळवणूक होईल असे प्रकार घडल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्यात यईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com