फेर आरक्षण सोडतीमध्ये काहींचा हिरमोड तर काहीजण खुश !

पारनेर नगरपंचायत : नऊ ठिकाणी झाले फेरबदल
फेर आरक्षण सोडतीमध्ये काहींचा हिरमोड तर काहीजण खुश !

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता फेर आरक्षण सोडत करण्यात आली. या फेर आरक्षणात काहींचा हिरमोड तर काही ठिकाणी आनंदाचे वातावरण होते. आधीच्या आरक्षणात यावेळी 9 ठिकाणी बदल झाले आहेत.

या फेर आरक्षणाच्यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत, नगरपंचायत कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सोडत काढण्यात आलेल्या आरक्षणात पुढीलप्रमाणे प्रभागात बदल झाले आहेत. प्रभाग क्रमांक 1- पूर्वीचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग नवीन आरक्षण-सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 2- पूर्वीचे आरक्षण-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) नवीन आरक्षण- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला).प्रभाग क्रमांक 3-पूर्वीचे आरक्षण- सर्वसाधारण (महिला), नवीन आरक्षण-सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 4- पूर्वीचे आरक्षण- सर्वसाधारण नवीन आरक्षण- सर्वसाधारण.

प्रभाग क्रमांक 5-पूर्वीचे आरक्षण- सर्वसाधारण, नवे आरक्षण- सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 6- पूर्वीचे आरक्षण- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), नवीन आरक्षण- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 7- पूर्वीचे आरक्षण-सर्वसाधारण, नवीन आरक्षण -सर्वसाधारण (महिला). प्रभाग क्रमांक 8-पूर्वीचे आरक्षण- अनुसूचित जाती, नवीन आरक्षण -अनुसूचित जाती. प्रभाग क्रमांक 9- पूर्वीचे आरक्षण- सर्वसाधारण महिला नवीन आरक्षण-सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 10- पूर्वीचे आरक्षण- सर्वसाधारण. नवीन आरक्षण- सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 11- पूर्वीचे आरक्षण- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नवीन आरक्षण-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. प्रभाग क्रमांक 12-पूर्वीचे आरक्षण- सर्वसाधारण, नवीन आरक्षण सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 13 - पूर्वीचे आरक्षण- सर्वसाधारण महिला, नवीन आरक्षण-नागरिकांचा मागास प्रवर्ग. प्रभाग क्रमांक 14- पूर्वीचा आरक्षण- नागरिकांचा मागास प्रवर्ग. नवीन आरक्षण- नागरिकांचा मागास प्रवर्ग. प्रभाग क्रमांक 15- पूर्वीचे आरक्षण- सर्वसाधारण महिला, नवीन आरक्षण - सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 16- पूर्वीचे आरक्षण-सर्वसाधारण महिला नवीन आरक्षण-सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 17-पूर्वीचे आरक्षण- सर्वसाधारण महिला नवीन आरक्षण- सर्वसाधारण महिला.

फेर आरक्षणामध्ये नऊ ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अनेकांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे, तर अनेक भागात आरक्षणामुळे बाहेर पडलेले उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीनंतर चांगलीच रंगत भरणार आहे. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी ही प्रमुख लढत होत असतानाच भाजप आणि काँग्रेस यांची काय भूमिका राहते यावरच पारनेर नगरपंचायतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Stories

No stories found.