विरोधीपक्ष नेत्याच्या प्रश्नांपुढे जिल्हा शल्यचिकित्सक यांची भंबेरी

परिचारिका संघटनेचे सोमवारपासून राज्य पातळीवर आंदोलन
विरोधीपक्ष नेत्याच्या प्रश्नांपुढे जिल्हा शल्यचिकित्सक यांची भंबेरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर दौर्‍यावर आलेल्या भाजपच्या विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातील अग्नीतांडव झालेल्या आयसीयूला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांना अग्नीतांडव आणि त्यानंतरच्या घटना क्रमाची माहिती विचारात असतांना डॉ. रामटेके यांची भंबेरी उडाली.

यावेळी माजी मंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये अग्नीशमन यंत्रणा होती का?, आग विझविण्यासाठी पाण्याचे स्पिंक्लर होते का?, राज्यातील अन्य जिल्ह्यात आगीच्या घटना घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासन सावध झाले नव्हते का, एक आयसीयू बंद असून दुसरे सुरू आहे? नसल्यास अत्यावश्यक रुग्णांवर कोठे उपचार करणार आणि त्यांना उपचार न मिळाल्यास त्याला जबाबदार कोण आदी प्रश्नांचा माराच त्यांनी डॉ. रामटेकेवर केला.

याची उत्तरे देतांना डॉ. रामटेके यांची दमछाक झाली. अखेर अधिवेशनानूसार आगीच्या आधीची परिस्थिती आणि आग लागल्यानंतर आजपर्यंतचा घटनाक्रम कागद्यावर मला पाठवा अशी तंबी दरेकर यांनी दिली. त्यानंतर त्यांनी परिचारिकांच्या आंदोलनाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी गुन्हा दाखल झालेल्या परिचारिकांना दोष मुक्त करण्यासाठी अधिवेशात आवाज उठवू, हे सरकार चोर सोडून संन्यासाला फाशी देत आहेत. सरकारला सामान्यांचे काहीही घेणे देणे नाही. परिचारिकांना कायदेशीर लढा देण्यासाठी सर्वोतो मदत करण्यात येईल, अशी घोषणा केली.

दरम्यान, परिचारिका संघटनेच्या कार्याध्यक्षा सुरेखा आंधळे यांनी सोमवारपासून परिचारिकांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू होणार आहे. या अग्नीतांडव प्रकरणात अधिकार्‍यांपासून सर्वांवर गुन्हे दाखल व्हावेत, डॉ. ढोकणे रजेवर असतांनाही त्यांना निलंबित करण्यात आले. कोविड काळात 24 तास काम करणार्‍यांना सरकारने अशी प्रकारे बक्षीस दिलेले आहे, आदी आरोप केले.

डॉ. सातळकर यांनी याठिकाणी मृत रुग्णांच्या शवविच्छेदन अहवालाची माहिती दिली. यात 9 लोक हे गुदमरून मृत्यू पावले असून यातील तिघांच्या अंगावर भाजल्याच्या जखमा आहे. मात्र, या जखमांवरून त्यांचा मृत्यू भाजून झालेला नाही. 1 रुग्ण पूर्णपणे भाजलेला असून त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे. तर एकाचा मृत्यू कशामुळे झाला हे समजत नाही. तर दुसरीकडे पोलीसांनी लावलेली कलमे ही घाईघाईने आणि शहानिषा न करता लावली आहेत. त्यादिवशी सण असल्याने कर्मचारी साध्या वेशात होते. तसेच तेथील सीसीटीव्ही कॅमेरे हे एकाच अँगल एकाच दिशेत असल्याने त्यामुळे त्याला अंतिम आधार मानता येणार नाही, हे विरोधीपक्ष नेते दरेकर यांच्या निदर्शनास आणून दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com