एलसीबीचे झेंडीगेट परिसरात कत्तलखान्यावर छापे

एलसीबीचे झेंडीगेट परिसरात कत्तलखान्यावर छापे

38 गोवंशीय जनावरांची सुटका, चार जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर|Ahmedagar

कोतवाली पोलिसांच्या (Kotwali Police) आशीर्वादाने झेंडीगेट (Zendigate) परिसरात सुरू असलेल्या चार कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या तीन लाख रूपये किंमतीच्या 38 लहान- मोठ्या जनावरांची सुटका (Animals Relise) करण्यात आली. या प्रकरणी अलीशान रफिक कुरेशी (वय 30 रा. व्यापारी मोहल्ला), अब्दुल रहीम कुरेशी (वय 45 रा. खाटीक गल्ली), तोफीक युनुस कुरेशी (रा. व्यापारी मोहल्ला), मोबीन कुरेशी (पूर्ण नाव माहिती नाही, रा. झेंडीगेट) यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संदीप घोडके यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अलीशान कुरेशी व अब्दुल कुरेशी यांना ताब्यात घेतले आहे.

कोतवाली पोलिसांसोबत असलेल्या अर्थपूर्ण व्यवहारातून झेंडीगेट (Zendigate) परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची कत्तल केली जात आहे. कोतवाली पोलिसांकडून यावर कारवाई केली जात नाही. सदर कत्तलखाने बंद करण्यासाठी नागरिकांनी वारंवार निवेदन दिले आहेत. परंतु, पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गुरूवारी रात्री एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katke) यांच्या यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून त्यांच्या पथकाने चार ठिकाणी छापेमारी करून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 38 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे.

सदरची कारवाई सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, कोतवाली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सतीष शिरसाठ, सहायक फौजदार मन्सुर सय्यद, पोलीस कर्मचारी दादासाहेब काकडे, सखाराम मोटे, बबन मखरे, फकीर शेख, दत्तात्रय गव्हाणे, व्ही. ए. बेरड, सुरेश माळी, विशाल दळवी, सचिन आडबल, सुनील चव्हाण, रवी सोनटक्के, संदीप पवार, ज्ञानेश्वर शिंदे, किरण जाधव, संदीप दरंदले, कमलेश पाथरूट, विनोद मासाळकर, जालिंदर माने, रोहित येमूल, आकाश काळे, मच्छिंद्र बर्डे, संदीप चव्हाण, कोतवाली पोलीस ठाण्याचे शाहीद शेख, प्रमोद लाहारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com