वांबोरीत जुगार अड्ड्यावर ‘एलसीबी’चा छापा

वांबोरीत जुगार अड्ड्यावर ‘एलसीबी’चा छापा

राहुरी (प्रतिनिधी) - अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दि. 24 मे रोजी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जुगार्‍यांना ताब्यात घेतले आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरू होता. याची खबर मिळताच अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने दि. 24 मे रोजी साडेचार वाजे दरम्यान अचानक छापा टाकला. यावेळी काही जुगारी गोलाकार बसून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता तिरट नावाचा हारजीतचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. तसेच त्यांच्याकडून 4,990 रुपये रोख रक्कम व तिरट नावाचे जुगाराचे साहित्य असा मुद्देमालासह मिळून आला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकातील हवालदार रोहित येमुल यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी अंकुश गंगाधर मकासरे (वय 32), राहुल विठ्ठल धनवटे (वय 30), विकास नारायण कुसमुडे (वय 25), राजेंद्र पांडुरंग व्यवहारे (वय 47), अमोल प्रभाकर कुसमुडे (वय 38) सर्व रा. वांबोरी, ता. राहुरी या पाचजणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा रजि. नं. व कलम - 397/2021 मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार आव्हाड हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com