नेप्तीत हातभट्टी दारूची निर्मिती

एलसीबीचे दोन ठिकाणी छापे
नेप्तीत हातभट्टी दारूची निर्मिती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील (Nagar Taluka) नेप्ती शिवारात (Nepati) हातभट्टी दारू अड्डे (Hatbhatti Liquor Den) पुन्हा सुरू झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (LCB Police) दोन ठिकाणी छापे (Raid) टाकून तयार दारू, कच्चे रसायन व साधने असा 58 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. याप्रकरणी दोघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कानिफनाथ भिमाजी कळमकर (वय 40 रा. नेप्ती), राजु छबु पवार (वय 30 रा. नेप्ती) अशी गुन्हे दाखल झालेल्या हातभट्टी चालकांची नावे आहेत. नेप्ती शिवारात वारंवार कारवाई करून देखील हातभट्टी दारूची निर्मिती केली जात आहे. नगर तालुका, एलसीबीच्या पथकाने यापूर्वी देखील येथे कारवाई केल्या आहेत. पुन्हा हातभट्टी निर्मिती अड्डे सुरू झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

त्यांनी नियुक्त केलेल्या पथकातील पोलीस अंमलदार विजय वेठेकर, बबन मखरे, शिवाजी ढाकणे, विनोद मासाळकर, रोहित यमूल, संभाजी कोतकर यांनी नेप्ती शिवारात छापे टाकले. कळमकर याच्याकडे 35 लीटर दारू व 600 लीटर रसायन मिळून आले तर पवार याच्याकडे 50 लीटर दारू व 400 लीटर रसायन मिळून आले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com