पारनेर तालुक्यात पाच ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापे

पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त: सहा जणांवर गुन्हे
पारनेर तालुक्यात पाच ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापे

अहमदनगर|Ahmedagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) पारनेर तालुक्यातील (Parner Taluka) पाच ठिकाणी दारू अड्डयांवर कारवाई (Action on liquor) करत एक लाख 70 हजार 900 रूपयांची देशी, विदेशी, ताडी, गावठी हातभट्टी दारू व इतर मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. याप्रकरणी सहा आरोपीविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात (Parner Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संतोष मधुकर साळवे (वय 42 रा. ढवळपुरी), अनिल सतिराम विधाटे (वय 21), दत्तात्रय तिकोले (दोघे रा. वणकुटे), पंडा रामभाऊ खंडवे (वय 30), नितीन मारूती साळवे (वय 45 दोघे रा. पळसी), संभाजी विठ्ठल गव्हाणे (रा. म्हसे) असे गुन्हे दाखल झालेल्या दारू विक्रेत्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांना दिले आहेत.

पोलीस निरीक्षक अनिल कटके (PI Anil Katke) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष लोंढे, जालींदर माने, कमलेश पाथरूट, राहुल सोळुंके, सागर सुलाणे यांच्या पथकाने शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवस पाच ठिकाणी अवैध दारू धंद्यावर कारवाई केली.

Related Stories

No stories found.