एलसीबीचा हातभट्टीवर छापा

54 हजारांचा मुद्देमाल जप्त || एकाविरूध्द गुन्हा
एलसीबीचा हातभट्टीवर छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव उपनगरात सुरू असलेल्या हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा टाकून कारवाई केली. कारवाईदरम्यान 40 हजार रूपये किंमतीचे 800 लीटर कच्चे रसायन, 14 हजार रूपये किंमतीची 140 लीटर दारू असा 54 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अंमलदार सचिन आडबल यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सचिन बाळासाहेब पवार (रा. पोपटवाडी, लिंकरोड, केडगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. छापा पडताच तो पसार झाला आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, आडबल, ज्ञानेश्‍वर शिंदे, संदीप दरंदले, रणजित जाधव यांचे पथक शहरातील अवैध धंद्यावर कारवाई करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, सचिन पवार हा घराच्या आडोशाला हातभट्टीची निमित्ती करून विक्री करत आहे.

पथकाने दुपारी पंचासमक्ष लिंकरोडवरील पवार याच्या घराजवळ छापा टाकला. पोलीस येताच पवार पसार झाला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून पवार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com