संगमनेर, घारगावचे दोन सराईत गुन्हेगार अटकेत

हद्दपार आदेशाचा भंग करून नगर जिल्ह्यात करत होते वास्तव्य
संगमनेर, घारगावचे दोन सराईत गुन्हेगार अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यातून (Ahmednagar District) हद्दपार करण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना एलसीबीच्या पोलिसांनी (LCB Police) संगमनेर (Sangamner) व घारगाव (Ghargav) येथुन ताब्यात घेत अटक (Arrested) केली. रावसाहेब किसन थोरात (वय 37 रा. कवठे कमळेश्वर ता. संगमनेर) व आण्णासाहेब सुर्यभान वाडगे (वय 41 रा. येठेवाडी, खंदरमळा ता. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत.

संगमनेर, घारगावचे दोन सराईत गुन्हेगार अटकेत
गोदावरी उजव्या कालव्यात बुडून वृध्दाचा मृत्यू

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर (LCB PI Dinesh Aher) यांना आगामी सण व उत्सव अनुषंगाने नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करून सदरचे हद्दपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करून नगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.

संगमनेर, घारगावचे दोन सराईत गुन्हेगार अटकेत
मोठी बातमी : राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा मोठा झटका ?

त्यानुसार निरीक्षक आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, शंकर चौधरी, संतोष लोढे, संदीप चव्हाण, रणजीत जाधव व चंद्रकांत कुसळकर यांचे पथक संगमनेर (Sangamner) व घारगाव (Ghargav) मधील हद्दपार गुन्हेगारांना चेक करीत असताना निरीक्षक आहेर यांना माहिती मिळाली कि, हद्दपार इसम रावसाहेब थोरात व आण्णासाहेब वाडगे हे हद्दपार असताना लपूनछपून संगमनेर व घारगाव येथे त्यांचे राहते घरी वास्तव्य करीत आहेत.

संगमनेर, घारगावचे दोन सराईत गुन्हेगार अटकेत
शहराला नियोजनबद्ध दररोज पाणीपुरवठा केला जाईल - आ. जगताप

आता गेल्यास मिळुन येईल, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अंमलदार यांनी नमुद हद्दपार इसमांचा शोध घेतला असता हद्दपार इसम रावसाहेब किसन थोरात व आण्णासाहेब सुर्यभान वाडगे हे संगमनेर (Sangamner) व घारगाव (Ghargav) येथे त्यांचे राहते घरी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांचे विरूध्द संगमनेर तालुका (Sangamner Taluka) व घारगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

संगमनेर, घारगावचे दोन सराईत गुन्हेगार अटकेत
‘अवकाळी’मुळे जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशीही दाणादाण
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com