14 वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद

एलसीबीने राहुरीत ठोकल्या बेड्या
14 वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा न्यायालयाकडील दरोड्याच्या गुन्ह्यातील 14 वर्षापासून फरार असलेला स्टॅण्डींग वॉरंटमधील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहुरी येथून ताब्यात घेत जेरबंद केले. शंकर विजय जगधने (वय 32 रा. एकलव्य वसाहत, राहुरी खु. ता. राहुरी) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सन 2008 पासून फरार होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने जिल्ह्यातील फरार, पाहिजे आरोपी तसेच स्टॅण्डींग वॉरंट, नॉनबेलेबल वॉरंट व बेलेबल वॉरंट मधील आरोपींची माहिती काढुन त्यांचे विरूध्द कारवाई करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना आदेश दिले आहेत.

त्या अनुषंगाने निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विष्णु घोडेचोर, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, रोहित येमुल, सागर ससाणे, रणजीत जाधव यांनी आरोपी शंकर जगधने याला राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला पुढील आवश्यक कारवाई करीता राहुरी पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com