लक्ष्मणनाथ महाराज यांचे निधन

कानिफनाथ मंदिर परिसरात समाधी सोहळा
लक्ष्मणनाथ महाराज यांचे निधन

सोनई (वार्ताहर) - नाथ संप्रदाय करीता मोठे योगदान असलेले व चंद्रगुप्तीचे सलग बारा वर्ष पीर असलेले पीरयोगी लक्ष्मणनाथ महाराज (वय-100) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. नेवासा तालुक्यातील जळका-बाभुळखेडा शिव येथे असलेल्या कानिफनाथ मंदीर परीसरात त्यांचा समाधी सोहळा पार पडला.

समाधी सोहळ्यास योगी, महंत व शिष्यगण उपस्थित होते. यावेळी त्यांचा धर्मनाथ नाथ संप्रदायाप्रमाणे विधीवत सोहळा, पुजन व श्रद्धांजली कार्यक्रम झाला. लक्ष्मणनाथ महाराज यांचे बारा वर्षातून एकदा येत असलेल्या नवनाथ झुंड कार्यक्रमात मोठे योगदान असायचे. अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचा भक्तवर्ग महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात होता.

यावेळी सुखदेवनाथ, महंत योगी अमृतनाथ, महंत आकाशनाथ, महंत चंद्रभगवान,गजानान मुनी आश्रम (हिंगोली)चे मठाधिपती योगी ॠषीनाथ महाराज, महंत नवमीनाथ,मठाधिपती महंत बहसपतीनाथ, हंत दिपकनाथ सह राज्यातून अनेक साधूसंत, योगी, शिष्यगण व मोजके भक्तगण उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com