घर खाली करण्यासाठी महिलेला दमदाटी

लॉरेन्स स्वॉमीसह 13 जणांविरूध्द गुन्हा
Crime
Crime

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घर खाली करण्यासाठी घरात घुसून महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. डीएसपी चौक परिसरातील कॉटेन्जा रोड येथे ही घटना घडली असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत ही घटना घडली.

व्हीक्टोरीया फ्रान्सीस जॉर्ज (वय 39) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवप्रसाद कुमार, लॉरेन्स स्वॉमी आणि किरण चार्ल्स मत्त्य (रा. तारकपुर, अहमदनगर) यांच्यासह 10 अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉरेन्स स्वामी आणि किरण यांच्यासह सात ते आठ जणांनी जॉर्ज यांच्या घरात घुसत घराचे खरेदी खत दाखवा, ही जागा ख्रिश्चन समाजाची आहे, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.

तसेच घरा बाहेर ढकलून देत जिवे मारण्याची धमकी दिली. तर 1 सप्टेंबर रोजी शिवप्रसाद आणि तीन जण दारू पिऊन जॉर्ज यांच्या घरात घुसले. त्यांनी मी जीएमपीचा माणूस आहे, असे म्हणत घरातील आयकार्ड नेत चौकशी नंतर ताब्यात देऊ असे सांगितले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार गंगावणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com