लॉरेन्स स्वामीसह आठ जणांविरूद्ध मोक्का

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांची मंजूरी
लॉरेन्स स्वामीसह आठ जणांविरूद्ध मोक्का

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

भिंगारमधील लॉरेन्स स्वामीसह आठ जणांविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाठविलेल्या मोक्का प्रस्तावाला मंजुरी दिली

असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिली.

खंडणीच्या गुन्ह्यात लॉरेन्स स्वामीला अटक करण्यात आली आहे. स्वामीसह प्रकाश भिंगारदिवे (रा. निंबोडी ता. नगर), संदीप शिंदे (रा. बुरुडगाव ता. नगर), विक्रम गायकवाड, बाबा उर्फ भाऊसाहेब आढाव (दोघे रा. वाळुंज ता. नगर), संदीप वाकचौरे (रा. दरेवाडी ता. नगर), अर्जुन डूबे (रा. दरेवाडी ता. नगर) व बाळासाहेब भिंगारदिवे यांच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव अधीक्षक मनोज पाटील यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याचे डॉ. दिघावकर यांनी सांगितले.

भिंगार पोलिसांनी स्वामीसह आठ जणांविरूद्ध मोक्का प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठविला होता. अधीक्षक पाटील यांनी त्यातील त्रुटी दूर करत परिपूर्ण प्रस्ताव महानिरीक्षकांकडे मंजुरीसाठी मागील आठवड्यात पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे.

दरोडयाच्या गुन्ह्यात पोलिसांनी सिनेस्टाईल लॉरेन्स स्वामीला अटक केली होती. या गुन्ह्यात तो जामिनावर सुटताच त्याला खंडणीच्या दुसर्‍या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com