अकोले तालुक्यात परसबाग विकसन मोहिमेस प्रारंभ

अकोले तालुक्यात परसबाग विकसन मोहिमेस प्रारंभ

अकोले (प्रतिनिधी) / Akole - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत अकोले तालुक्यात बचत गटांच्या माध्यमातून तीनशे परसबागांची निर्मिती करण्यात आली असून अजून पाचशे बाग तयार केले जाणार आहे. (My Nutrition Garden Development Campaign)

पंचायत समिती अकोलेच्या माध्यमातून माझी उपजीविका समृद्धी मोहीम व माझी पोषण परसबाग विकसन मोहीम दि.15 जुन ते 15 जुलै या कालावधीत शासन स्तरावर राबविण्यात येत आहे. अकोले तालुक्यात बचत गटांच्या सहभागाने विविध ठिकाणी सेंद्रिय पद्धतीच्या परस बागा तयार करून प्रत्येक कुटुंबाला विषमुक्त पालेभाज्या व फळभाज्या उपलब्ध करून देण्याचा प्रमुख उद्देश परसबाग निर्मिती मध्ये आहे.

सदर परस बागेत लागवड करण्यासाठी गावरान वाण उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये वांगे, पालक मेथी, भेंडी, टमाटर, कोथिंबीर, गवार, कारले, विविध प्रकारचे घेवडा वाल, शपू, मिरची, आळु, राजगिरा, उडीद, नाचणी, फुलझाडे, कोरपड, पुदिना यांचे वाण देण्यात येऊन लागवड करण्यात येत आहे. तालुक्यात किमान आठशे परस बागा बनविण्याचे उद्दीष्टे आहे. त्यापैकी आजपर्यत तालुक्यात एकुण तिनशे पेक्षा जास्त परसबागा बनविण्यात आलेल्या आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.

सदर मोहीम राबविण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, तालुका व्यवस्थापक सोमनाथ गुंजाळ, कुंदन कोरडे, प्रभाग समन्वयक कुलदीप पाटील, दिगंबर म्हस्के, अमर कोळी, पल्लवी कोंडार यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

पदमश्री राहीबाई पोपरे यांनी देशी वाणाचे जतन केले असून नैसर्गिक व विषमुक्त शेती झाली पाहिजे असा त्या नेहमी आग्रह धरतात म्हणून प्रत्येक नागरिकाने आपले घरासाठी तरी याचा उपयोग करून विषमुक्त शेती करावी यासाठी हे परसबाग निर्माण करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे तालुका व्यवस्थापक सोमनाथ गुंजाळ यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com