अहमदनगर जिल्ह्यात ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीमे’ला सुरुवात

उमेदच्या उपक्रमातून मिळणार विषमुक्त भाजीपाला
अहमदनगर जिल्ह्यात ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीमे’ला सुरुवात

अहमदनगर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्यभरात 15 जून ते 15 जुलै 2021 या कालावधीत ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ राबवण्यात येत आहे. या मोहीमेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात उमेदच्या महिला बचत गटांमार्फत आतापर्यंत 1300 सेंद्रिय पोषण परसबागा तयार करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात एकूण 10 हजार सेंद्रिय पोषण परसबागांची निर्मिती करण्यात येणार आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला, फळभाज्या, औषधी वनस्पती या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत अशी माहिती अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांनी दिली.

करोनामुळे शहरी व ग्रामीण भागातील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागामध्ये पोषण आहाराचा प्रश्‍न बिकट झाला आहे. रासायनिक खतांच्या वापरातून उत्पादित भाजीपाला बाजारात मिळतो. त्याचे भावही अव्वाच्यासव्वा असतात. त्यावर पर्याय शोधून ग्रामीण भागातील लहान मुले, किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांना आहारामध्ये पोषकद्रवे मिळावी.

कमी खर्चामध्ये पोषक, सेंद्रिय पद्धतीने उत्पादित फळभाज्या, पालेभाज्या व औषधी वनस्पती त्यांच्याच गावात दररोज उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषद, अहमदनगर व उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या मार्फत माझी पोषण परसबाग विकसन मोहीम सुरु करण्यात आली आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून उमेदच्या बचत गट, ग्रामसंघ यांच्यामार्फत समुदाय स्तरीय पोषण परसबाग व प्रती कुटुंब वैयक्तिक पोषण परसबाग तयार करण्यात येणार असून या परसबागेमध्ये सुरुवातीच्या सात वाफ्यामध्ये पालेभाज्या व अन्य सात वाफेमध्ये फळभाज्या तसेच परसबागेच्या कडेला वेलवर्गीय भाज्यांची लागवड करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे कुटुंबाला वर्षभर विषमुक्त सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाला मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावरून कृतीसंगम विभागांतर्गत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत उमेदच्या समुदाय संसाधन व्यक्ती, प्रभाग समन्वयक, तालुका व्यवस्थापक हे गाव पातळीवर याचे प्रात्यक्षिक करून दाखविणार आहेत. पोषण परसबागेच्या निर्मितीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील कुमार पठारे यांचे मार्गदर्शन लाभले.

अहमदनगर जिल्ह्यात ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीमे’ला सुरुवात
लस घेण्यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी अनिवार्य नाही

प्रति ग्रामपंचायत 10 ते 15 पोषण परसबागा

उमेदच्या अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर कार्य करणार्‍या समुदाय संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून प्रति ग्रामपंचायत 10 ते 15 पोषणपरस बागा तयार करण्यात येणार असून या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबांना विषमुक्त सेंद्रिय पालेभाज्या दररोज उपलब्ध होणार आहेत.

परसबाग स्वरुप

एकूण वाफे - 14, बाहेरील 7 वाफे - फळभाज्या लागवड, आतील 7 वाफे - पालेभाज्या लागवड, सर्वात आतील वाफा - औषधी वनस्पती लागवड, मधील वर्तुळ - अझोला वनस्पती लागवड किंवा कंपोस्ट खत खड्डा, बाह्य वर्तुळाबाहेर - फळझाडे, परसबागेमध्ये रस्त्यांलगत-बांबू/लाकूड रोवून वेलवर्गीय भाज्या लागवड.

अहमदनगर जिल्ह्यात ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीमे’ला सुरुवात
करोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट लसीकरणाचे संरक्षण झुगारून देऊ शकतो - एम्स प्रमुख

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com