मोफत ७/१२ वाटप योजनेचा संगमनेर तालुक्यात शुभारंभ

मोफत ७/१२ वाटप योजनेचा संगमनेर तालुक्यात शुभारंभ

संगमनेर | प्रतिनिधी

महसूल विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत ७/१२ वाटप आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती पासून सुरू करण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ आज राजापूर येथे करण्यात आला.

या अनुषंगाने संगमनेर तालुक्यातील प्रत्येक सजेच्या किमान एका गावात आज या योजनेचा शुभारंभ करण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. आज स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांचे वारस, दीव्यांग खातेदार, वयोवृद्ध खातेदार यांना त्यांच्या घरी जाऊन तलाठी यांचे मार्फत ७/१२ देण्यात येत आहेत. याशिवाय, गावातील माजी सैनिक अथवा कार्यरत सैनिक यांचे कुटुंबीय, १९४७ सालात जन्म झाला आहे असे खातेदार, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे असे शेतकरी, २ ऑक्टोबर जन्मतारीख असलेले खातेदार, गावातील वरिष्ठ महिला खातेदार यांना आज मोफत ७/१२ वितरित करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

तालुक्याचा मुख्य कार्यक्रम राजापूर येथे आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, संतोष हासे, तहसीलदार अमोल निकम, नायब तहसिलदार उमाकांत कडनोर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.