संगमनेर | प्रतिनिधी

करोना लसीकरणाला संगमनेरात सुरुवात झाली असून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात कोविड-19 कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांचे हस्ते आज झाले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया लोहारे यांना पहिली लस देवून या लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात करोनाचे संकट उभे राहिल्यापासून बाधितांची सेवा करणार्या शासकीय व खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका व अन्य आरोग्य कर्मचार्यांना ही लस देण्यात येणार आहे. जिल्हा यंत्रणेने तालुकानिहाय आरोग्य कर्मचार्यांची नोंदणी शासकीय पोर्टलवर केली असून त्यास संगमनेरातील 2 हजार 750 जणांचा समावेश आहे. संगमनेरसाठी 300 डोस प्राप्त झाले आहे. हे सर्व डोस ग्रामीण रुग्णालयातील शितुसाखळीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

आज सकाळी 11 वाजता ग्रामीण रुग्णालयात कोविड-19 लसीकरण कक्षाचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांचे हस्ते झाले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया लोहारे यांना पहिली लस देवून या लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. दुसरा डोस डॉ. जगदीश वाबळे यांना तर तिसरा डोस डॉ. राजेंद्र मालपाणी यांना देण्यात आला.

यावेळी इन्सीडेंट कमांडर तथा तहसिलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर भवर, डॉ. राजकुमार जर्हाड, डॉ. संदीप कचेरिया, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, वैद्यकीय अधिकारी सीमा गोडसे, आरोग्य सहाय्यक विनायक वाडेकर, सतीश बुरंगुले, कैलास ढगे आदि उपस्थित होते. प्राप्त झालेल्या 300 डोस पैकी 70 व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. कोविड व सरकारी नियमांचे काटेकोर पालन करुन लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला आहे.