संगमनेरचे करोना शतक
सार्वमत

संगमनेरचे करोना शतक

84 तालुक्यातील व 15 बाहेरील

Arvind Arkhade

संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्याने करोना रुग्णांचे शतक गाठले. काल दोन महिला व एक पुरुष असे तीन व्यक्तींचे करोना पॉझिटिव्ह अहवाल स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले. संगमनेर तालुक्याने शंभरी गाठली आहे. त्यामध्ये 84 तालुक्यातील व 15 बाहेरील असून सध्या 15 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.

शहरातील मोमीनपुरा येथील एका 46 वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा येथील 50 वर्षीय महिला तर कुरण येथील 85 वर्षीय महिला या तिघांचे करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहे. सकाळी दोन अहवाल प्राप्त झाले होते त्यानंतर सायंकाळी एका वृद्ध महिलेचा अहवाल प्राप्त झाला आहे.

हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मोमीनपुरा व नाईकवाडपुरा भागात स्थानिक प्रशासनाने धाव घेतली. बाधीत व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com