संगमनेरकरांचा तहसिल कार्यालयासमोर ठिय्या

बंदचा निर्णय व्यावसायिकांना ऐच्छिक
संगमनेरकरांचा तहसिल कार्यालयासमोर ठिय्या

संगमनेर | प्रतिनिधी

कुठलाही शासकीय आदेश नसतांना बळजबरीने पोलीस, पालिका प्रशासनाकडून शहरातील दुकाने सायंकाळी 5 नंतर बंद केली जात आहे.

या कार्यवाही विरोधात आम्ही संगमनेरकर व संघर्ष टपरीधारक संघटनेने आज सकाळी तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत असा कोणाताही शासकीय आदेश नाही तसेच या वेळेत आपले व्यवसाय सुरु ठेवायचे की बंद करायचे याचा निर्णय व्यावसायिकांना ऐच्छिक असेल, सकाळी 7 ते 5 या वेळेचे कोणतेही बंधन नाही असे प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले.

संगमनेरकरांचा तहसिल कार्यालयासमोर ठिय्या
संभाजीराजे छत्रपती उद्या नगर जिल्हा दौऱ्यावर, 'कोपर्डी' पुन्हा चर्चेत

महाराष्ट्र शासनाने संपर्ण राज्यात 1 एप्रिल 2021 ते 6 जून 2021 पर्यंत लॉकडाऊन लागू केलेला होता. त्याचे संगमनेरकांनी पालन करुन प्रशासनास सहकार्य केलेले आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी यांनी 4 जून 2021 रोजी आदेश काढून लॉकडाऊन शिथिल केलेले आहे. त्याचे सुद्धा संगमनेर मधील छोटे दुकानदार, व्यापारी, हातगाडीवाले, भाजीपाला, फळे, हॉटेल, सलुन, स्टेशनरी व इतर लहान मोठ्या आस्थापनावले नियमांचे पालन करत आहेत. असे असतांना अचानक व्यापारी संघटनेचे काही पदाधिकारी व प्रशासन यांच्यातील बैठकीनुसार दुकाने सकाळी 7 ते 5 सुरु ठेवण्याबाबत आवाहन करुन जनतेमध्ये संभ्रम केला गेला त्याचा संगमनेरातील छोटे व्यवसायीक, संघर्ष टपरीधारक संघटनेने निषेध केला आहे.

करोना रुग्ण प्रमाण थांबले पाहिजे हे सर्वांना मान्य आहे पण आज जी आर्थिक मानसिक घडी छोट्या मोठ्या दुकानदार कर्जबाजारी झाले आहेत. त्यातच दुकान भाडे, लाईट बिल, स्थानिक कर, कामगार पगार यामुळे सर्व व्यावसायिक चिंतेत आहेत. त्याबाबत सुद्धा असे आवाहन करतांना प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे. 5 नंतरचे बंदबाबतचे आवाहन हे सक्तीचे नसावे, व्यापारी संघटनेचे जे पदाधिकारी अथवा इतर मोठे व्यापारी आहे त्यांना जर त्यांचे दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेवायचे असेल तर त्यांना ते ठेवू द्यावे, पण सामान्य छोटे दुकानदार, गरीब टपरीधारक, भाजीपाला, फले, सलुन, स्टेशनरी, बेकरी, हातगाडीवाले यांना नगरपालिका व पोलीस यांच्याकडून वेठीस न धरता जिल्हाधिकारी यांची जी नियमावली आहे त्यानुसार व्यवसाय करुन द्यावा, जर त्यांच्या कडून कोविड नियमांचे पालन होत नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक, दुकान सील करणे अशी कारवाई करावी, असा कुठलाही आदेश नाही तर पालिकेकडून बाजारपेठेत व इतर ठिकाणी भोंगा लावून दुकाने 5 वाजता बंद करा, असे सांगितले का जात आहे? करोनाच्या नावाखाली सुरु असलेली प्रशासनाची मनमानी तसेच पोलीस पथक 5 वाजता दुकानदारांना बळजबरीने दुकाने बंद करण्यास सांगत आहेत हे तात्काळ थांबवावे, अशी मागणी संगमनेरकरांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आंदोलनकर्त्यांना नायब तहसिलदार उमाकांत कडनर सामोरे गेले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. निवेदन स्विकारले. यावेळी अमोल खताळ, अ‍ॅड. संग्राम जोंधळे, जावेद जहागिरदार, ज्ञानेश्‍वर कर्पे, पप्पु कानकाटे, अमित चव्हाण, राहुल भोईर, दिपक ताटकर, अक्षय थोरात, संतोष पठाडे, सोमनाथ परदेशी, विजय बेल्हेकर, विनोद वाडेकर, दिपक साळुंके, गुरुनाथ बाप्ते, जालिंदर लहामगे, केशव जाधव, भालचंद्र गायकवाड, अजय नाकील, सुचिता ठाकुर, नानासाहेब पर्बत, वेदांत मानवतकर, अजिंक्य उपासणी आदि उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यातील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडी ठेवावी. जेणेकरुन नागरिकांची गर्दी होणार नाही व करोना विषाणुचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होणार नाही व अहमदनगर जिल्हा तसेच संगमनेर तालुका पूर्णपणे लॉकडाऊन होणार नाही, यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, अशा स्वरुपाचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलेले होते. परंतु सदर बाबतीत दुकाने बंद ठेवण्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश नाहीत. संगमनेर तालुक्यात करोना विषाणु या आजाराची परिस्थिती पाहता व्यापारी बांधव व जनतेस दुकाने स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्याबाबत प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

उमाकांत कडनर, नायब तहसिलदार, संगमनेर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com