श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील एकाची जमिनी परस्पर दुसर्याने विक्री करणार्या टोळ्यांचे कारनामे थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता घोटवी या गावातील 9 हेक्टर जमीन मूळ मालकाच्या परस्पर सूर्यकांत कोल्हे यांना विकण्यात आली.

याबाबत खरेदी दस्तही करण्यात आला. मात्र जमीन नावावर होत नसल्याने याबाबत संशय आल्याने कोल्हे यांनी माहिती घेतली असता त्यांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. या व्यवहारात तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक आठ जणांनी केली असल्याचे उघड झाले आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सूर्यकांत रावसाहेब कोल्हे (वय 45, धंदा-व्यापार रा. आनंदविहार अपार्टमेंट स्टेशन रोड मल्हार चोक नगर) यांनी फिर्याद दिली असून विशाल संपत वाघमारे (रा.कोळगाव), रवि संजय ढवळे (रा.काळकाई चोक श्रीगोंदा),विश्वजीत रमेश कासार (रा.वाळकी ता.नगर), सुनील फक्कड आडसरे(पत्ता माहीत नाही), बनावट अनोळखी इसम (अर्पणा आनंद शेजबळ यांचे जागी उभी असलेली), बनावट इसम (आनंद केशव शेजवळ यांचे जागी उभा असलेला) दोन्ही काळकाई चौक श्रीगोंदा, इंद्रजित रमेश कासार (रा.वाळकी ता.नगर), कोमल विश्वजीत कासार (रा.वाळकी ता.नगर) यांनी कोल्हे यांचा विश्वास संपादन करून 10 जुलै 2020 ते 24 नोव्हेंबर 2020 या काळात घोटवी येथील मूळ जमीन मालक आनंद केशव शेजवळ (रा. बिल्डीगं नंबर 3.3/55 पोफनवाडी कळबादेवी मुबंई) यांची 9 हेक्टर 89 गुंठे ही जमीन नावावर करून देतो असे सांगत यापैकी 20 गुंठे जमीन परस्पर कोल्हे यांना विकली.

मात्र, मूळ मालक शेजवळ यांच्या जागी बनावट इसम उभा करून खरेदी खत करून दिले. मूळ मालक हेच असे खोटे सांगून त्याचेजागी खरेदी खतामध्ये बनावट इसम हा आनंद शेजवळ असल्याचे भासवून प्रथम 9 हेक्टर 89 आर जमिनीची कागदपत्र बनवून त्यापैकी खरेदीखत कागदपत्रात बदल करून 20 गुंठे एवढ्या जमिनीचे खरेदीखत त्यामध्ये बनावट आधारकार्ड छायांकित प्रत बनवून कोल्हे यांची रुपये 1 कोटी 55 लाख 2 हजार 300 रुपयांची फसवणूक केली असल्याचे म्हटले आहे.