जमीन व्यवहारात दोन लाखांची फसवणूक

वडगाव गुप्ता येथील घटना
जमीन व्यवहारात दोन लाखांची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जमिनीची खरेदी न देता ईसार रूपाने दिलेले दोन लाख रूपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय भाऊसाहेब सप्रे (रा. गरवारे चौक, शिवाजीनगर, नवनागापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संजय आनंदराव महाडिक (वय 41 रा. गरवारे चौक, शिवाजीनगर, नवनागापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

6 ऑगस्ट, 2022 रोजी ही घटना घडली असून सोमवार, 22 ऑगस्ट, 2022 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. महाडिक यांनी सप्रे यांची वडगाव गुप्ता (ता. नगर) शिवारातील सर्व्हे नं. 879/9 मधील एकुण सहा गुंठे जमीन विकत घेण्यासाठी त्यांना ईसार रूपाने चेकद्वारे दोन लाख रूपये दिले होते. सप्रे यांनी महाडिक यांना सदर जमिनीची खरेदी न देता जमिनीचा व्यवहार दुसर्‍या व्यक्तीसोबत केला. तसेच महाडिक यांनी दिलेली दोन लाख रुपये रकमेची मागणी करून देखील रक्कम परत न देता अपहार करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com