जमीन मोजणीसाठी होणारा उशीर शेतकर्‍यांसाठी ठरतोय मनस्ताप

File Photo
File Photo

राहाता | Rahata

ग्रामीण भागात शेत बांधावरचे वाढते वाद, कधी होणारी हाणामारी, अनेकांना शेतजमिनीची मोजणी मागूनही उशिरा मिळत असल्यामुळे शेतकर्‍यांना मोठी डोकेदुखी ठरत आहे.

भूमी अभिलेख कार्यालयात मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अनेक महिन्यापासून मोजणीसाठी पैसे भरूनही प्रकरणे प्रलंबित राहत आहे. त्यामुळे जमिनीच्या मोजणीला उशीर होत आहे. बांधाचा वाद थेट न्यायप्रविष्ट झाल्यानंतर जाणारा वेळ व होणारा मानसिक त्रास, बसणारा आर्थिक फटका थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेख कार्यालयातील मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. पैसे भरून वेळेवर न होणारी शेतजमिनीची मोजणी शेतकर्‍यांना मनस्ताप होण्यासाठी कारण ठरत आहे. या कार्यालयात शासनाने मनुष्यबळ वाढविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे

भूमिआभिलेख कार्यालयाकडे जमीन मोजणीचे पैसे भरून विहित कालावधीमध्ये मोजणी प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. शेतीच्या बांधावरून वाद निर्माण झाल्यामुळे न्यायालयामध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत. त्यास राहाता तालुक्यात अनेक शेतजमिनीचे वाद, रस्त्याचे वाद, जमिनीच्या हद्दीच्या खुणा नष्ट झाल्यामुळे जमिनीच्या बांधावरून अनेक वाद निर्माण होत आहेत. यावर खात्रीशीर पर्याय म्हणून जमिनीची सरकारी यंत्रणेमार्फत मोजणी करून हद्दीच्या खुणा कायम करणे हा पर्याय आहे. जमीन मोजणीचे चार प्रकार भूमी अभिलेख विभागाने करून दिलेले आहेत. त्यामध्ये नियमित मोजणी, तातडीची मोजणी, अति तातडीची मोजणी व अति अति तातडीची मोजणी.

यामध्ये नियमीत मोजणीसाठी पहीले 2 हेक्टर पर्यंत 1000 रुपये पुढील प्रत्येक दोन हेक्टर टप्पा 500 प्रमाणे, तातडीची मोजणी पहिलेे 2 हेक्टर पर्यंत 2000 रुपये पुढील 2 हेक्टर टप्पा 1000 प्रमाणे, अती तातडीची मोजणी पहिले 2 हेक्टर पर्यंत 3000 रुपये, पुढील 2 हेक्टर टप्पा 1500 प्रमाणे व अती अती तातडीच्या मोजणीसाठी पहिले दोन हेक्टरपर्यंत 12000 रुपये त्यापुढील 2 हेक्टर टप्पा 6000 प्रमाणे असे भूमी अभिलेख विभागाने जमीन मोजणीचे दर ठरवून दिलेले आहेत. असे असले तरी निश्चित कालमर्यादेत या कार्यालयाकडून कधीही मोजणी येत नाही. यामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती बघितल्यानंतर विविध पोलीस स्टेशनमध्ये बांधावरचे भांडणाचे प्रमाण वाढलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com