श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

खंडकरी शेतकर्यांना जमिनी परत देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. त्यात काही शेतकर्यांना जमिनी परत मिळाल्या आहेत. परंतु

तालुक्यातील काही मूळ खंडकरी शेतकर्यांना अजूनही जमिनी परत मिळाल्या नाहीत. त्या तातडीने देण्यात याव्यात अशी मागणी खंडकी शेतकर्यांनी एका निवेदनाद्वारे ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.

ज्या खंडकरी शेतकर्यांना अद्याप जमिनी परत मिळाल्या नाहीत त्या शेतकर्यांनी काल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देवून मागणी केली.

खंडकरी शेतकर्यांना जमिनी परत देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. त्यात काही शेतकर्यांना जमिनी परत मिळाल्या आहेत. परंतु तालुक्यातील काही मूळ खंडकरी शेतकर्यांना अजूनही जमिनी परत मिळाल्या नाहीत. श्रीरामपूर शहराजवळील चांगल्या जमिनी शेतकर्यांना देण्यात आलेल्या आहेत. शेती महामंडळाकडे अजूनही हजारो एकर शेती शिल्लक आहे. खराब खाच, खळगे असणार्या नापिक जमिनी त्यातही एका ठिकाणी न देता निम्मी जमिनी एका दुसर्या ठिकाणी (तुकडे करून) अशा पद्धतीने मूळ खंडकरी शेतकर्यांना प्रयत्न होत आहे. जमिनीचे तुकडे झाल्याने शेतकर्यांना जमिनी कसणे अतिशय अवघड होणार आहे. चांगल्या जमिनी अजूनही शिल्लक असून मूळ खंडकरी शेतकर्यांना देत नाहीत. अशा जमिनी शेती न महामंडळ पुन्हा व्यापार्यांना कराराने देत आहे. त्यामुळे मूळ खंडकरी शेतकर्यांवर अन्याय झालेला आहे.

आमच्या तीन तीन पिढ्या या जमिनीच्या लढ्यात वाया गेलेल्या आहेत. तरीही आम्हाला न्याय मिळालेला नाही. तरी या प्रकरणी लक्ष घालून शेती महामंडळाने शेतकर्यांना जमीनी वाटप कराव्यात अशा सूचना देवून हा प्रश्न सोडवावा. अन्यथा आम्हाला सामुहिक आत्मदहन केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर चिमन फरगडे, शंकरराव फरगडे बाबुराव फरगडे, बाळासाहेब फरगडे जगन्नाथ फरगडे, अण्णासाहेब फरगडे, चंद्रभान फरगडे, ज्ञानेश्वर फरगडे, दिगंबर फरगडे, दत्तात्रय फरगडे, नितीन फरगडे किशोर फरगडे, प्रविण उरगडे, संदीप फरगडे, सचिन फरगडे, प्रमोद फरगडे यांच्या सह्या आहेत.