सावकाराने २ लाखांत बळकावली जमीन

सावकाराने २ लाखांत बळकावली जमीन

कर्जत (प्रतिनिधी)

२ लाखांच्या कर्जाच्या बदल्यात शेतकऱ्याची २८ लाख रुपयांची जमीन सावकाराने बळकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी त्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुखदेव दिनकर केदारी असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे. कर्जत तालुक्यातील रातंजन नजीकच्या भिसे वस्ती येथील एक तक्रारदार (वय ५६) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी २०१५ मध्ये मुलीच्या लग्नासाठी आपले ओळखीचे नातेवाईक असलेल्या दत्तात्रय कोरडे यांच्या मध्यस्थीने खाजगी सावकार सुखदेव दिनकर केदारी याच्याकडून ५ रुपये दरमहा टक्केवारीने २ लाख रुपये घेतले होते.

शिवीगाळी दमदाटी करून शेतकऱ्याची रातंजन शिवारात असलेली ५० आर जमीन सावकाराने आपला मुलगा गणेश याच्या नावे खरेदी करून घेतली. जमिनीची विक्री करण्याचा प्रयत्न केला. यातून २७ मार्च २०१६ रोजी तक्रारदाराच्या मुलाने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तर २२ जून २०१६ रोजी नगरच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जमीन बळकावलेबाबतचा अर्ज तक्रारदारांनी दाखल केला. अखेर यास कंटाळून तक्रारदार यांनी तिघांविरोधात फिर्याद दिली आहे.

Related Stories

No stories found.