लंके विरोधात कोतवालीत गुन्हा; काय आहे प्रकरण?

लंके विरोधात कोतवालीत गुन्हा; काय आहे प्रकरण?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जमिनीचा ठरल्या प्रमाणे व्यवहार करून न देता दोन लाख रूपये घेऊन एका व्यवसायिकाची फसवणुक केली आहे. या प्रकरणी काल बुधवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शंकर भाऊ लंके (वय 38 रा. वडझिरे ता. पारनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सोन्याबापु नामदेव घेंबुड (वय 30 रा. सानेवाडी रोड, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

शंकर भाऊ लंके व सोन्याबापु नामदेव घेंबुड यांच्यामध्ये जमिनीचा व्यवहार सहा लाख रूपयेमध्ये ठरला होता. लंके याने घेंबुड याच्याकडून 24 जानेवारी, 2015 रोजी दोन लाख रूपये घेतले होते. दरम्यान दोन लाख रूपये घेऊन देखील खरेदीखत करून दिले नाही.

घेंबुड यांनी लंके याला दिलेले दोन लाख रूपये परत मागितले असता ते न देता उलट त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच विश्वासघात करून फसवणुक केली आहे. यासंदर्भात घेंबुड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. सदरच्या तक्रारीबाबत तपास करून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com