महामार्गासाठी जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांना मोबदला द्या

शेतकर्‍यांची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
महामार्गासाठी जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांना मोबदला द्या

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातून जाणार्‍या पैठण - पंढरपूर व खखंडी कासार - लोहा राष्ट्रीय महामार्गातील शेतकर्‍यांच्या जमिनीचा आर्थिक मोबदला व ईतर अडचणी त्वरीत सोडवाव्यात अन्यथा पाथर्डी येथील प्रांताधिकारी यांच्या कार्यालयावरती घंटानाद व बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा भालगाव येथील माजी सरपंच अंकुश कासोळे व परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी निवेदनातून तहसीलदारांना दिला आहे.

तहसीलदार श्याम वाडकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पैठण -पंढरपूर व खरवंडी कासार - लोहा ह्या दोन महामार्गाच्या कामात आपल्या तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी भूसंपादीत झाल्या आहेत. रस्त्याचे काम अंतीम टप्प्यात आले असून शेतकर्‍यांना भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. रस्त्याच्याकडेला साईट गटार खोदकाम झाले नसल्याने पावसाच्या पाण्याने शेत जमिनीच्या नुकसानी झाल्या आहेत. मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यात यासंदर्भात उकांडा फाटा येथे रास्तारोको आंदोलन यापूर्वी केले होते.

अनेक दिवसांपासूनच्या हा प्रलंबित असणार्‍या या प्रश्ननाची शासनाने दखल घेऊन तात्काळ मार्गी लागावेत अन्यथा 10 ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी पाथर्डी येथील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन व बैठा सत्याग्रह करणार आहोत.असा इशारा देण्यात आला आहे.तालुक्यातील खरवंंडी भालगाव, मिडसांगवी, मुंगुसवाडे, परिसरातील ग्रामस्थ निवेदन देताना उपस्थित होते.प्रवीण खेडकर,विष्णू थोरात,गणेश सुपेकर,रमेश सुपेकर,सुभाष खेडकर, बाबासाहेब खेडकर, दत्ता सुपेकर,अशोक खेडकर,दादासाहेब खेडकर आदींच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com