जमिनीच्या वादातून पढेगावात पती-पत्नीस बेदम मारहाण

7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जमिनीच्या वादातून पढेगावात पती-पत्नीस बेदम मारहाण

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी|Kopargav

तुझी जमीन आमच्या नावावर करून दे, असे म्हणून शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण करून विषारी औषध बळजबरीने तोंडात ओतले व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील पढेगाव येथे घडली. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक पगारे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, पढेगाव येथील शेतात मी व पत्नी मक्याच्या शेतात खुरपणी करत असताना आरोपी जनार्दन सुखदेव पगारे व त्याचा मुलगा याससह सात जणांनी तुझी जमीन आमच्या नावावर करुन दे, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करुन मला व पत्नीला बेदम मारहाण केली. माझ्या तोंडात बळजबरीने विषारी औषध ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

आरोपी जनार्दन आहेर, त्याचा मुलगा वैभव जनार्दन आहेर, भाऊसाहेब भीमराज पगारे, हर्षद भाऊसाहेब पगारे, नंदाबाई जनार्दन पगारे, सविता भाऊसाहेब पगारे, आरती वैभव पगारे, सर्व रा. पढेगाव यांनी फिर्यादी अशोक पगारे यास गैर कायद्याची मंडळी जमवून वाईट वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून तसेच काहीतरी विषारी औषध बळजबरीने फिर्यादी भावाच्या तोंडात ओतले व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे . तालुका पोलिसांनी भादंवि कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 149 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे. कॉ. एन. एस. शेख हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com