जमिनीचा वाद; तरूणावर ब्लेडने वार

दातरंगे मळ्यातील घटना; भावकीवर गुन्हा
जमिनीचा वाद; तरूणावर ब्लेडने वार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील भांडणाच्या कारणावरून तरूणाच्या छाती व दंडावर ब्लेडने वार करून जखमी केले. संदीप प्रभाकर दातरंगे (रा. दातरंगे मळा, अहमदनगर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. अहमदनगर शहरातील दातरंगे मळा येथे बुधवारी रात्री सव्वा दहा वाजता ही घटना घडली. या प्रकरणी भावकीतील तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी संदीप दातरंगे यांनी फिर्याद दिली आहे.

दत्ता दातरंगे, अक्षय दातरंगे व शुभम दातरंगे (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. दातरंगे मळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपी व फिर्यादी यांच्यात जमिनीचा वाद सुरू आहे. या वादातून 27 मार्च, 2022 रोजी सायंकाळी आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली होती. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बुधवार, 30 मार्च 2022 रोजी फिर्यादी व त्यांची मुलगी दुचाकीवरून जात असताना आरोपींनी फिर्यादीला मागील भांडणावरून शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दत्ता दातरंगे यांने त्याच्याकडील ब्लेडने फिर्यादीच्या छाती, दंडावर वार करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com