जमिनीच्या वादातुन 42 वर्षीय महिलेचा खुन

जमिनीच्या वादातुन 42 वर्षीय महिलेचा खुन

आष्टी |प्रतिनिधी| Ashti

वटणवाडी (Vatanwadi) येथील एका 42 वर्षीय महिलेचा जमिनीच्या (Woman) वादातुन खुन (Murder by Dispute) करून मृतदेह (Dead Bodies) जमिनीत गाढुन पुरावा नष्ट केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस येताच तिघाजणांना आष्टी पोलिसांनी (Ashti Police) मोठ्या शिताफीने अटक (Arrested) केली आहे. मयत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून भरत गायकवाड, प्रल्हाद घुमरे, सुनिल गांगड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदा गायकवाड असे खुन (Murder) करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील (Ashti Taluka) वटणवाडी येथील मंदा हिराभाऊ गायकवाड वय 45 वर्ष हिला भावकीतीलच भरत गायकवाड व जावई प्रल्हाद घुमरे, आणि त्याचा मित्र सुनिल गांगड हे सतत महिलेला फोन करून व प्रत्यक्ष भेटुन जमिन (Land) आमच्या नावावर कर असा तगादा लावत जिवे मारण्याची धमकी द्यायचे. यातुनच त्यानी 3 नोव्हेंबर 2021 रोजी सदरील महिलेला रात्री शेतात तुरीला पाणी देण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन तिचा खुन करून मृतदेह जमिनीत पुरून टाकल्याचे बुधवारी निष्पन्न होताच मयत महिलेचा भाऊ केरू किसन चितळे याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात यातील आरोपी भरत पोपट गायकवाड रा. वटणवाडी, प्रल्हाद नवनाथ घुमरे, सुनिल पंढरीनाथ गांगड दोघे रा. घाटापिंपरी यांच्या विरोधात खुन व मृतदेह नष्ट करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही आरोपीना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोसावी, यांनी भेट दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com