जमीन वाटपाच्या वादातुन बाप लेकात हाणामारी

एकमेंकाची फोडली डोकी
जमीन वाटपाच्या वादातुन बाप लेकात हाणामारी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील (Parner Taluka) रांजणगाव रोड (Rajangav Road) येथील एका कुंटूंबात जमिनीच्या वाटपावरुन बापलेकात हाणामारी (Father And Son Beating) झाली असुन दोघांनी परस्पर फिर्यादी दिल्या असुन यात दोघाचेही डोंकी फुटली आहेत.

याबाबत माहिती अशी की, सुखदेव सरोदे यांना दोन पत्नी असुन एक सावञ मुलगा व त्याच्यात जमिनीच्या वाटपावरुन मोठा वाद (Dispute) आहे. तो वाद सोमवारी उफाळून आला व बाप लेकातच हाणामारी (Beating) झाली. याबाबत मच्छिंद्र सुखदेव सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सोमवारी सकाळी 13 जुन 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता वडील सुखदेव सरोदे व सावञ आई राजुबाई सरोदे तसेच सावञ बहिणीचा मुलगा राजन सतिष सरोदे यांनी शेतात येऊन शिवीगाळ करत दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली. यात मी माझी आई मंदाबाई सरोदे, मिना सरोदे, मयुर सरोदे, दिव्या सरोदे, सविता कडूस जखमी (Injured) झाले आहेत.

तर दुसरी फिर्यात वडील सुखदेव सरोदे यांनी दिली असुन त्यांनी सांगितले कि, सोमवारी सकाळी मच्छिद्र सरोदे, मंदाबाई सरोदे, मिना सरोदे, मयुर सरोदे, दिव्या सरोदे, सविता कडुस यांनी शेतामध्ये येवून दगडाने व लाथाबुक्याने जबर मारहाण केली. सुपा पोलिसांनी (Supa Police) रांजणगाव (Rajangav) येथे जाऊन पंचनामा करुन दोन्ही जखमींना पारनेर ग्रामीण रुग्णालयात (Parner Rural Hospital) दाखल केले आहे.

सुपा पोलिसांनी (Supa Police) दोघांच्या फिर्यादी दाखल करुन घेत एकमेंंकाविरुध भा.द.वी. 143, 147, 334, 337, 323, 504 प्रमाणे गुन्हे दाखल केला आहेत. तसेच पुढील तपास सुपा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. छबु कोतकर पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com