जागेच्या वादातून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

नगर-औरंगाबाद रोडवरील अमीर मळ्यातील घटना
जागेच्या वादातून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-औरंगाबाद रोडवरील अमीर मळा येथे जागेच्या वादावरून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून जखमी झालेल्या बशीर खान पठाण यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.

बशीर पठाण यांच्या मांडीवर आधी तलवारीने वार केले व त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यामध्ये बशीर पठाण हे गंभीर भाजले आहेत.

बशीर पठाण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जमिनीचा वाद सुरू असून या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी रात्री उशिरा बशीर खान पठाण यांचा जबाब नोंदवून घेतला. तिघांनी मारहाण करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिलेल्या जबाबात म्हटले आहे. याबाबत भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान जागेच्या वादावरून थेट जिवंत जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com