दोन नेत्यात जमिनीच्या वादातून झोंबाझोंबी

राहुरी तालुक्यातील घटना : पोलिसात तक्रार देण्याचा बेत
दोन नेत्यात जमिनीच्या वादातून झोंबाझोंबी

राहुरी (प्रतिनिधी)

तालुक्यातील एका मोठ्या गावात शेतीच्या कारणावरून दोन प्रतिष्ठित गाव नेत्यांमध्ये शाब्दिक वादाबरोबरच चांगलीच झोंबाझोंबी झाल्याचे वृत्त आहे.

दोघेही राहुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडून आहेत. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, त्यातील एक नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती नातेवाईक असून दुसरा नेता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा जवळचा नातेवाईक असल्याची चर्चा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com