जमीन व गौण खनिजापोटी 13 कोटी 30 लाखाचा महसूल जमा

106 टक्के उद्दीष्ट्ये पूर्ण; जिल्ह्यात राहाता तालुका टॉपमध्ये
जमीन व गौण खनिजापोटी 13 कोटी 30 लाखाचा महसूल जमा

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्याला दिलेल्या शासकीय वसुली उद्दिष्टापैकी राहाता तालुक्यात या आर्थिक वर्षाअखेर शासकीय वसुलीत 106 टक्के उद्दिष्टपूर्ती करण्यात आली आहे. राहाता तालुक्याला शासकीय वसुली 12 कोटी 60 लाख रुपये देण्यात आली होती. मात्र तालुक्याने दि. 31 मार्च अखेर 13 कोटी 30 लाख रुपये वसुली करून 106 टक्के शासकीय वसुली उद्दिष्ट पूर्ण केले आहे. दिलेल्या उद्दिष्ट पैकी अधिक उद्दिष्ट साध्य करून अहमदनगर जिल्ह्यात राहाता तालुक्याने बाजी मारली आहे.

तालुक्याला वार्षिक शासकीय वसुली उद्दिष्ट 12 कोटी 60 लाख रुपये देण्यात आले होते. यात जमीन महसूल साठी 5कोटी 90 लाख तर गौण खनिज साठी 6 कोटी 70 लाख दिले होते. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वस्तुनिष्ठ नियोजन व दरमहा सातत्य यामुळे करोनाची परिस्थिती असूनही जमीन महसूल, नजराणा प्रकरण, मोजणी, कुळ कायदा प्रकरण, बिनशेती, शर्तभग, अनाधिकृत एन एस., तुकडा नियमाकुल, शासकीय कामे रॉयल्टी, गौण खनिज दंड, वाहतूक कारवाई या माध्यमातून तलाठी, मंडळ अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, नायब तहसीलदार यांनी अथक प्रयत्न, मेहनतीने वसुली पूर्ण केली. 13 कोटी 30 लाख रुपये वसुली करत 106 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. याबद्दल जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांनी राहाता तालुक्याचे तहसीलदार कुंदन हिरे व सर्व राहाता महसूल कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

त्याच प्रमाणे राहाता तालुक्याने 106 टक्के शासकीय वसुली करून जिल्ह्यात बाजी मारली असल्यामुळे राहाता तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून, सर्व क्षेत्रातील नागरिकांकडून, लोकप्रतिनिधींकडून राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांचे व तालुक्यातील सर्व तलाठी, मंडल अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

Related Stories

No stories found.