ना.थोरात यांच्या प्रयत्नातून निळवंडे प्रकल्पबाधितांना हक्काचे भूखंड

ना.थोरात यांच्या प्रयत्नातून निळवंडे प्रकल्पबाधितांना हक्काचे भूखंड

नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

अकोले (प्रतिनिधी) / Akole - निळवंडे धरण येथील प्रकल्पबाधित झालेल्या मातंग समाजातील बांधवांना राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या प्रयत्नांतून अकोले शहरात सीड्स फार्म येथे मिळालेल्या भूखंडाच्या पत्रांचे वाटप करण्यात आले.

निळवंडे धरण (Nilwande Dam) येथे या चौदा प्रकल्पबाधितांना अकोले शहरातील सीड्स फार्म येथे भूखंड धारक प्रमाणपत्राचे प्रमाणपत्र महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे ,मीनानाथ पांडे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळूरे, तहसीलदार मुकेश कांबळे, आदी उपस्थित होते .

निळवंडे धरणाच्या कार्यक्षेत्रात निळवंडे गावातील मातंग समाजातील अनेक कुटुंबांचे जमीन क्षेत्र बाधित झाले होते. ही कुटुंबे अनेक दिवस विस्थापित होऊन त्यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. याची दखल घेत राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी या कुटुंबांना हक्काचे भूखंड मिळावे यासाठी शासन स्तरावरून सातत्याने पाठपुरावा करून या कुटुंबांना पुनर्वसन योजनेअंतर्गत अकोले सीड्स फार्म येथे अधिकृत भूखंड मिळवून दिले .महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी प्रकल्पबाधित मधील अनेकांचे पुनर्वसन करताना अनेकांना संगमनेर मधील विविध सहकारी संस्थांमध्ये ही चांगल्या पदावर नोकऱ्या दिल्या आहेत. तसेच अनेकांचे आयटीआय कोर्स पूर्ण करून त्यांना नोकरी दिली तर संगमनेर व अकोले तालुक्यात अनेक शेतकर्‍यांचे पुनर्वसन करून त्यांना जमिनीही दिल्या.

उर्वरित मातंग समाजातील तेवीस कुटुंबांपैकी चौदा कुटुंबीयांना अकोले शहरात भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे .यावेळी संतोष गायकवाड, तुकाराम अवचीते, दत्ता अवचिते, संदीप अवचिते यांनी ही भूखंड मिळाल्यावर समाधानाची भावना व्यक्त करत नामदार बाळासाहेब थोरात यांनी गोरगरिबांना न्याय मिळवून दिल्याबद्दल समाधान आनंद व्यक्त केला. यावेळी रामू कोंडाजी अवचिते, नाना सन्तु अवचिते, सन्तु विठोबा अवचिते, मुरलीधर लक्ष्मण अवचिते ,भिका कुशाबा अवचीते, भाऊ चंदू अवचिते, बाबू किसन गायकवाड, गोपाळा गायकवाड, रामचंद्र गायकवाड, किसन अवचिते, बाबू गायकवाड, दादा गायकवाड, दगडू गायकवाड, यांना भूखंड लाभाचे पत्र दिले. यामुळे आदिवासी व प्रकल्पबाधित नागरिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com