भू-संपादनाविनाच कोल्हार-कोपरगाव चौपदरीकरणाचे काम

भू-संपादनाविनाच कोल्हार-कोपरगाव चौपदरीकरणाचे काम

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

ब्रिटीश कालिन कॉक्रीटचा सिंगल वे असलेला कोल्हार-कोपरगाव रस्त्याचे स्वांतत्र्यांनंतर एकदाही भुसंपादन झालेले नाही. सध्या या रस्त्यांचे राष्द्रीय महामार्ग योजनेतून चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. भुसंपादन न होताच हा रस्ता शेतकर्‍यांच्या शेतात घुसला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असुन शासनाने नियमा प्रमाणे संपादन करून शेतकर्‍यांना जमीनीची भरपाई द्यावी, अशी मागणी पिंपरी निर्मळ येथील शेतकरी व गणेशचे संचालक सुर्यकांत निर्मळ यांचेसह शेतकर्‍यांनी केली आहे.

नगर कोपरगाव रस्त्याचे सध्या राष्द्रीय महामार्ग योजनेतुन चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. हा रस्ता ब्रिटीश काळात सुरवातीला बारा फुट काँक्रीटचा होता. स्वांतत्र्यांनंतर याचे रूपांतर डांबरी सिंगल रस्त्यात झाले. वाहतुक वाढल्याने त्यांनंतरच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हा रस्त्याचे दोन पदरी डांबरीकरण झाले. राज्य महामार्ग क्र.10 नावाने ओळखला जाणारा हा रस्ता मध्यंतरी जागतिक बँक प्रकल्पाकडे वर्ग झाला. विभागाने या रस्त्याचे चौपदरीकरणा अंतर्गत मध्यापासून एका बाजुला साडे सात मिटर डांबरीकरण केले.

रस्त्याची दयनिय अवस्था व प्रवांशाचे हाल पाहता हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरीत करण्यात आला. एनएच-160 या क्रमांक मिळाल्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडुन या रस्त्याचे सध्या नव्याने चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. विभाग या रस्त्याचे मध्यापासून एकबाजुला 9 मीटर डांबरी व 15 मिटरपर्यत साईडपट्टी एवढ्या हद्दीत काम करीत आहे. या रस्त्यामध्ये काळानुरुप सार्वजनिक बांधकाम, जागतिक बँक प्रकल्प, नॅशनल हायवे असा बदल झाला. दरवेळी रस्त्याची रूंदीही वाढली मात्र स्वांतत्र्यांनंतरच्या काळात दर्जा व रुंदी वाढुन या रस्त्यासाठी नव्याने भुसंपादन झाले नाही.

आज काम करतांना शेतकर्‍यांच्या हद्दीत घुसुन काम करीत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. यामध्ये मोठी झाडे, शासकीय नाला बंडीगचे बांध बंदीस्ती निघत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.शेतकर्‍यांचा महामार्गाच्या कामाला विरोध नाही. मात्र शासनाने जादा लागणार्‍या जमीनीचे भु-संपादन करून शेतकर्‍यांना मोबदला द्यावा अशी मागणी या रस्त्याचे शेतकरी व राहाता तालुका असंघटीत कॉगेसचे अध्यक्ष सुभाष निर्मळ, गणेशचे संचालक सुर्यकांत निर्मळ, यादव घोरपडे, विठ्ठल घोरपडे आदीसह शेतकर्‍यांनी केली आहे.

आमचा रस्ता रूंदीकरणाला विरोध नाही. मात्र या रस्त्याचे स्वांतत्रोत्तर काळात एकदांही भुसंपादन झालेले नाही. रस्ता वेळोवेळी वाढत आहे. संपादन न होताच काम होत असल्याने उतार्‍याप्रमाणे क्षेत्र भरत नाही ते कमी पडत आहे. विभागाने आवश्यकतेप्रमाणे भुसंपादन करून उतार्‍यावरून क्षेत्र कमी करावे व शेतकर्‍यांना मोबदला द्यावा.

- सुर्यकांत निर्मळ, संचालक, गणेश सह साखर कारखाना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com