लहुजी शक्ती सेनेचे घंटानाद, बोंबाबोंब आंदोलन

श्रीगोंदातील सर्व संघटनांचा पाठिंबा
लहुजी शक्ती सेनेचे घंटानाद, बोंबाबोंब आंदोलन

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील पिंप्री कोलंदर येथील अरणगाव ते सकट वस्ती या गाव रस्त्यावर अतिक्रमण व खड्डे खोदून रस्ता आडवला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लहुजी शक्ती सेना संघटनेने शहरात घंटानाद व बोंबाबोंब आंदोलन केले. यास सर्व संघटनानी श्रीगोंदा तहसील कार्यालय समोर उस्फुर्त पणे सहभागी होत पाठिंबा दिला. यापुढेही समाजावर होणार्‍या अन्यायाबाबत सर्व संघटना आपापले जोडे बाहेर ठेवून अखिल तालुका सकल मातंग समाज एकत्र येऊन सदर प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय राहील असे समाजाचे जेष्ठ नेते वसंतराव सकट यांनी जाहीर केले. यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दिवसभर बोंबाबोंब व घंटानाद आंदोलन करत असताना तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी गटविकास अधिकारी यांना व अभियंता कांगुणे साहेब व त्यांचे कर्मचारी यांना बोलावून अतिक्रमण काढून रस्ता सुरळीत करून द्यावा असा आदेशच दिला. त्यावेळेस त्वरित गटविकास अधिकारी यांना त्यांचे कर्मचारी यांची त्वरित घटना स्थळी रवाना झाल्याने बोंबाबोंब व घंटानाद आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी राज्याचे नेते वसंतराव सकट,जिल्हा युवकअध्यक्ष उत्तम रोकड, जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम काळे, तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे, ता.महिलाध्यक्षा पुष्पा शेंडगे,

उपाध्यक्षा कामिनी सकट, उपाध्यक्ष दत्ता शिंदे, सचिव मनोज घाडगे, प्रसिद्धी प्रमुख संतोष शेंडगे, विधानपरिषद अध्यक्ष संदिप अवचिते,श्रीगोंदा शहराध्यक्ष प्रफुल्ल आडागळे, शिरुर शहराध्यक्ष बंटी जोगदंड, मोनिका जाधव, वसंत अवचिते आदी उपस्थित होते.

तीन वर्षांपासून पाठपुरावा

पिंपरी कोलंदर येथील रस्ता आडवल्याबाबत गेली तीन वर्षापासून सतत पाठपुरावा करण्यात आला परंतु कोणीही दखल घेतली नाही. सदर रस्त्यास सन 2014 15 च्या नियोजनात तांत्रिक मंजुरी असून त्यावर निधीही वर्ग करण्यात आला होता. मात्र काही गाव गुंडांच्या जमिनी शेजारी असल्याने त्यावर त्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले व डाळिंबाच्या बागा उपटून रस्त्यावर टाकल्या आणि रस्त्याच्या मधोमध आडवे चर खोदून दलित वस्तीकडे जाणारी वाटच अडवली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com