डिझेलअभावी बसेस डेपोतच उभ्या प्रवाशांची गैरसोय दूर करावी- श्रीगोड

डिझेलअभावी बसेस डेपोतच उभ्या प्रवाशांची गैरसोय दूर करावी- श्रीगोड

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

डिझेल (Diesel) घेण्यासाठी एस. टी. महामंडळाकडे (S.T Mahamandal) पैसेच नसल्यामुळे अनेक बसेस डेपोतच (Bus Depo) उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रार प्रवासी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड (Ranjit Shrigod) यांनी केली आहे.

परिवहन मंत्र्यांना (Minister of Transport) पाठविलेल्या निवेदनात प्रदेशाध्यक्ष श्रीगोड (Ranjit Shrigod) यांनी म्हटले आहे की, करोनाचे (Corona) सावट थोडेफार कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी एस. टी. महामंडळाच्या (S.T Mahamandal) आडमुठेपणामुळे नागरिक विशेषत: महिला वर्ग त्रस्त झाला आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून या महिन्यात सणामुळे महिला वर्ग आपल्या माहेरी नातेवाईकाकडे जात असतो. महिलांना सुरक्षित प्रवास (Safe travel for women) हा केवळ एस. टी. (ST Bus) बसचाच वाटत असल्यामुळे बसने प्रवास करण्यास महिला आग्रह धरतात. असे असले तरी केवळ बसला इंधन (Fuel) नसल्यामुळे अनेक बस डेपोतच उभ्या आहेत. बस नसल्यामुळे प्रवाशांची तर कुचंबणा होत आहे.

इंधन (Fuel) नसल्याने बस चालक व वाहक यांनाही कामे राहिलेले नाहीत. करोनामुळे बस बंद (Covid Problem Bus Close) होती. त्यामुळे त्यांना कामही नव्हते. आता बस सुरू होऊन देखील केवळ चुकीच्या नियोजनामुळे बस डेपोतच (Bus Depo) उभ्या आहेत. या नुकसानीस जबाबदार कोण? एस. टी. महामंडळाच्या गलथान काराभारामुळे महामंडळासहीत सर्वच जण अडचणीत सापडले आहेत. केवळ डिझेल (Diesel) अभावी बस डेपोत (Bus Depo) उभ्या राहत असतील तर त्यासारखे दुसरे दुर्दैव नाही, असा सवाल श्रीगोड यांनी केला आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री (CM) , उपमुख्यमंत्री (Deputy CM), विरोधी पक्ष नेते (Leader of the Opposition), खासदार (MP), आमदार (MLA) यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com